Devendra Fadnavis Cabinet Expansion
Devendra Fadnavis Cabinet Expansion महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवीत महायुतीने 200 च्या वर जागा जिंकल्या, बहुमतचे सरकार आल्यावर आता मंत्रिमंडळात कुणाला सामील करायचे व कुणाला डच्चू द्यायचा याबाबत महायुती पुढे मोठा पेच उभा आहे.
आज नागपुरातील राज भवनात दुपारनंतर मंत्री मंडळाचा विस्तार करीत मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे, अनेक आमदारांना मंत्रीपदासाठी फोन करण्यात आला असला तरी अनेक जेष्ठ आमदारांना फोन न आल्याने धाकधूक वाढली आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात रोजगाराची संधी, मिळेल 50 हजार पगार
भाजपने आधीच नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार असल्याची माहिती दिली होती, तसेचं महायुती मधील घटकपक्षांनी सुद्धा हाच फॉर्म्युला वापरला असल्याची माहिती आहे.
ज्यांना मंत्रीपदासाठी कॉल आला नाही त्यामध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांना फोन आलेले नाही. भाजपकडून सुधीर मुनंगटीवार (sudhir mungantiwar), रवींद्र चव्हाण तसेच शिंदे सेनेचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांनाही फोन आलेले नाही. त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. ज्यांना मंत्री पदासाठी फोन आले त्यांची संभाव्य यादी सुद्धा पुढे आली आहे.
मंत्रिमंडळात या नावांची शक्यता
भाजप – देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, जयकुमार रावल, नितेश राणे, शिवेंद्रसिंह भोसले, पंकज भोईर गणेश नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ, अतुल सावे, संजय सावकारे, आकाश फंडकर, अशोक उईके जयकुमार गोरे
शिवसेना – एकनाथ शिंदे, संजय शिरसाठ, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, योगेश कदम, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जैस्वाल
राष्ट्रवादी – अजित पवार, नरहरी झिरवाळ, हसन मुश्रीफ, अनिल भाईदास पाटील, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, सना मलिक – राज्य, इंद्रनील नाईक – राज्य
चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 7 वेळा जिंकणारे बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अजूनही फोन आला नसल्याची माहिती आहे.
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया (bunty bhangdiya) यांनी विजयाची हॅट्रिक मारली असून त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे.