earthquake today
Earthquake today चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के चंद्रपूर जिल्ह्यात जाणवले आहे.
या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ अशी नोंदविण्यात आलेली आहे.
sorry या शब्दाचा फुलफॉर्म माहीत आहे काय?
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री विनय गौडा जी सी . यांनी केले आहे. Earthquake just now
नेमकं काय घडलं?
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागात सकाळी 7 वाजून 27 मिनिटांनी घराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला, नागरिकांनी पळापळ केली, काही वेळाने तो भूकंपाचा हादरा असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. Earthquake today
चंद्रपूर जिल्ह्यात आधीच कोळसा खाणी मुळे चंद्रपूर जिल्हा पोखरून निघाला आहे आणि अश्यात हे धक्के येणाऱ्या मोठ्या घटनेची चाहूल तर नाही अशी चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
या देशातील वादग्रस्त प्रथा, भाड्याने मिळते बायको, पुस्तकातून खुलासा
गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा सुरजागड येथील लोह खनिजांच्या उत्खनन मुळे सुद्धा जमीन पोखरत चालली आहे. तेलंगणा राज्यातील मुलुगु हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा हा तेलंगणा राज्याला लागून असल्याने हे धक्के जाणवले, यावर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन करीत पुन्हा असे धक्के जाणवले तर घराबाहेरील सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. Earthquake just now
भूकम्प आल्यास काय करावे?
- छताच्या प्लास्टरिंगमधील भेगा आणि पाया दुरुस्त करा. संरचनात्मक कमतरतेची चिन्हे असल्यास, तज्ञांचा सल्ला घ्या.
- ओव्हरहेड लाइटिंग फिक्स्चर (झूमर इ.) छतापासून योग्यरित्या लटकवा.
- पक्क्या भागात बांधकाम मानकांसाठी संबंधित BIS नियमांचे अनुसरण करा.
- भिंतींवर शेल्फ् ‘चे अव रुप काळजीपूर्वक बांधा.
- खालच्या शेल्फवर मोठ्या किंवा जड वस्तू ठेवा.
- बाटलीबंद खाद्यपदार्थ, ग्लासेस आणि पोर्सिलेन यांसारख्या तुटण्यायोग्य वस्तू तळाच्या बंद लाकडी कॅबिनेटमध्ये ठेवा.
- जड वस्तू जसे की चित्रे आणि आरसे बेड, सेटी (सोफा, बेंच किंवा पलंग) आणि लोक जेथे बसतात त्यापासून दूर ठेवा.
- नट आणि बोल्टच्या साहाय्याने फॅन फिक्स्चर आणि ओव्हरहेड लाइट्स व्यवस्थित बसवा.
- खराब झालेले किंवा सदोष विद्युत वायरिंग आणि गळती होणारी गॅस जोडणी दुरुस्त करा, ज्यामुळे आगीचा धोका संभवतो.
- वॉटर हीटर्स, एलपीजी सिलिंडर इत्यादी भिंतीला सुरक्षितपणे बांधलेले आहेत किंवा जमिनीवर बोल्ट केलेले आहेत याची खात्री करा.