Eco-friendly products | चंद्रपूर जिल्ह्यातील या सरपंचाने केली कमाल

Eco-friendly products

Eco-friendly products : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. कळमना हे पंचकोशीत स्मार्ट सरपंच (smart sarpanch) नंदकिशोर वाढई यांच्या ध्येय वेड्या सामाजिक उपक्रमांसाठी आता बऱ्यापैकी ओळखले जात आहे.

राष्ट्रसंतांच्या विचारांचे कार्यकर्ते श्री. वाढई त्यांच्या चिकित्सक अभ्यासु वृत्तीने कळमना गाव स्वच्छ, सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक करण्यासाठी शासनाच्या विविध योजना येथे हिरिरीने राबवितात.

अमित शाह विरोधात आंबेडकरी जनता आक्रमक

शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण पूरक विविध उपक्रम, वुक्ष लागवड अश्या अनेक बाबींवर त्यांनी काम केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्या पासून पर्यावरण पूरक असे बरीकेट्सची निर्मिती करून त्यांच्या सहाय्याने वृक्ष संवर्धनासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

त्रासाला कंटाळून युवकांनी केला खून

यासाठी त्यांच्या उपक्रमाला गावातील गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक व गावातील सामाजिक काम करणारे होतकरू तरुण यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे पर्यावरणाचा रास होणार नाही आणि वुक्षाच संवर्धन व जतन होईल अशी ध्येये वेळी कल्पना अमलात आणली आहे.


या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचा प्रत्यक्ष वापर करण्याला येथे सुरुवात करण्यात आली असून याचा शुभारंभ स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्तुजी पिंपळशेंडे, गणपती कुकुडे, मदन वाढई, अमोल कावळे, विठ्ठल विदे, सुरेश मुठलकर, दौलत विदे, शामराव अटकारे, सुधाकर पिंगे, घनश्याम वाढई, प्रभाकर पिंगे, जेष्ठ नागरिक कवडु पिंगे, सुभाष वाढई, अशोकराव कावळे, कवडु मुठलकर, भाऊराव कावळे, पुंडलिक मेश्राम व होतकरू तरुण रमाकांत वाढई, आशिष ताजणे, श्रावण कुचणकर, दिवाकर पिंगे, अतुल क्षिरसागर, संदीप गिरसावळे, ज्ञानेश्वर बोढे, शैलेश पिंगे, गोलु आंबिलकर, अतुल अटकारे यश विदे, गणेश वाढई, विशाल नागोसे, भारत टेकाम यासह स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मला कळमना येथील माय बाप जनते करीता काम करता येते आहे हि गोष्ट माझ्यासाठी फारच आनंदाची बाब आहे माझ्या वर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव आहे त्यामुळे च मी गावातील च नव्हे तर परिसरातील जनतेची सेवा करीत आहेत आणि यापुढेही नेहमीच नवीन नवीन कल्पकतेने सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी व कळमना हे आदर्श गाव करण्यासाठी प्रयत्न करत राहील.

आज पिण्याच्या पाण्याचा रिकाम्या बाटल्या पासून पर्यावरण पूरक वुक्ष संवर्धनासाठी बरीकेट मला सर्वांच्या मदतीने तयार करता आले त्याचा मला आनंद आहे गुरुदेव सेवा मंडळ, जेष्ठ नागरिक व गावातील सामाजिक काम करणारे होतकरू तरुण मंडळी यांचे सहकार्य मला वेळोवेळी लाभते आहे त्यांचा मला अभिमान आहे असे मत नंदकिशोर वाढई सरपंच कळमना तथा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर यांनी व्यक्त केले

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!