evm hatao desh bachao
evm hatao desh bachao नुकत्याच महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीत महायुतीने विरोधकांना चांगलीच चपराक देत 200 च्या वर जागा जिंकल्या, त्यानंतर विरोधकांनी हा विजय ईव्हीएम मशीनचा आहे असा सूर लावत ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन उभारण्याचे संकेत दिले.
6 डिसेंम्बर रोजी चंद्रपुरातून ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
कांग्रेस चे परिवहन विभागाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सचिन रामटेके यांनी ईव्हीएम मशीन हटाव असा नारा देत आमरण उपोषणाला सुरुवात केली.
ताडोब्यात रिसॉर्ट च्या नावावर 41 लाखांची फसवणूक
विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात ईव्हीएम मशीन द्वारे घोळ करीत महायुतीने निवडणुका जिंकल्या आहे, त्यामुळे आता ह्या ईव्हीएम मशीन बंद करीत बॅलेट पेपर वर निवडणुका व्हायला हव्या याकरिता मी आजपासून आमरण उपोषण करीत आहो अशी प्रतिक्रिया रामटेके यांनी दिली. Evm machine controversy
ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात आली आहे, जर असेच सुरू राहीले तर पुढच्या काळात निवडणुका घेण्याची गरज सत्ताधारी पक्षाला भासणार नाही कारण बहुमत ते मशिनद्वारे सहजरित्या मिळवू शकतात, विरोधी पक्षाला संपविण्याचा हा भाजप सरकारचा डाव आहे.
जोपर्यंत ईव्हीएम मशीन बंद होणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहणार आहे असा इशारा सुद्धा रामटेके यांनी प्रशासनाला दिला आहे.