Female businessman missing : चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी 10 दिवसापासून बेपत्ता

Female businessman missing

Female businessman missing चंद्रपूर – व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे दहा दिवसापासून बेपत्ता असून अरुणाचे अपहरण आहे की घातपात यांचा तातडीने शोध घेण्याबाबत चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघा कडून अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.


व्यापारी असोसिएशन चिमूरच्या सदस्या तथा देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका अरुणा अभय काकडे वय अंदाजे 37 वर्ष ह्या दिनांक 26 नोव्हेबर 2024 रोज मंगळवार ला नेहमीप्रमाणे सकाळी चिमूर नागपुर बसने नागपुर येथे दुकानातील सामान खरेदी करिता नागपुर येथील ईतवारी मार्केट मध्ये गेल्या होत्या. Female businessman missing

चंद्रपूर गुन्हेगारीचे मिर्झापुर

मिळालेल्या माहितीच्या आधारे असे कळले की अरुणा अभय काकडे ह्या सकाळी चिमुर येथून नागपुर बस स्टैंड ला पोहोचल्यानंतर तिथून ऑटो ने तीन नल चौक, ईतवारी येथे पोहोचल्या, त्यानंतर त्या ईतवारी भंडारा रोड येथील बाटा शोरूम समोरून हरवलेल्या आहेत. Kidnapping

दिनांक 26 नोव्हेंबर पासून सौ अरुणा अभय काकडे यांच्या आप्त स्वीकीयांनी शोध घेऊन त्यांचा ठावठिकाणा न लागल्यामुळे पोलिस तक्रार दाखल केलेली आहेत.


सदर घटना घडून आजपावेतो 10 दिवस होऊन सुद्धा अरुणा अभय काकडे यांचा पत्ता न लागल्यामुळे अपहरण किवा अन्य घातपात होण्याची शक्यता आहे. करिता प्रकरणाची सखोल चौकशी करून सौ अरुणा अभय काकडे यांच्या शोध घेण्यात यावा या करिता अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जंनबंधू यांना निवेदन देण्यात आले. Kidnapping


यावेळी चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष सदानंद खत्री जिल्हा उपाध्यक्ष. प्रवीण सातपुते. प्रकाश पापांपत्तीवार. कोषाध्यक्ष अनिल गुप्ता. चिमूर व्यापारी असोशीयशांचे सचिव बबन बनसोड. भद्रावती व्यापारी असोसिएशनचे. शेख. चंद्रपूर चेंबरचे उपाध्यक्ष विनोद बजाज. सदस्य नारायण तोषनिवाल. चिमूर व्यापारी असोसियशंनचे प्रशांत चीडे. अविनाश अगडे. नागेश चट्टे. बालू सातपुते व चंद्रपूर जिल्हा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!