female dead body | महाकाली मंदिर परिसराच्या मागे आढळला महिलेचा मृतदेह

female dead body

female dead body : 11 डिसेंबर रोजी चंद्रपुरातील महाकाली मंदिरच्या मागे 70 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

सकाळी 9 वाजताच्या दरम्यान राकेश मारवे नामक व्यक्तीने शहर पोलिसांना संपर्क करीत महाकाली मंदिराच्या मागील भागात एक महिला पडलेल्या अवस्थेत होती, ती कसलीही हालचाल करीत नसल्याची माहिती मारवे यांनी पोलिसांना दिली.

गुन्हेगारीचे भूत आणि चंद्रपूर जिल्ह्यातील महिलेचा दृश्यम स्टाईल खून

पोलीस कर्मचारी निलेश मुळे व सुशांत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी अंदाजे 70 वर्षीय महिला आडब्लून आली, पोलिसांनी त्या महिलेला तात्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. mahakali mandir chandrapur

सदर अनोळखी महिलेचे कुणी नातेवाईक आहे का? याबाबत परिसरात पोलिसांनी चौकशी केली मात्र त्यांना काही याबाबत माहिती मिळाली नाही, पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.

सदर अनोळखी महिलेचे वर्णन..

वय 70 वर्ष ,चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे लांब, अंगावर निळ्या रंगाचा स्वेटर व कथ्या रंगाचा गाऊन घातलेली, दोन्ही पायास जुन्या आजाराचे डाग आहे.

सदर तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय मुके करीत असून सदर मृतका बाबत माहिती मिळाल्यास psi विजय मुके मो. क्र.9923401065 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!