free ambulance service
free ambulance service : भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्थेने लोकसहभागातून खरेदी केलेल्या दोन रुग्णवाहिकांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विधीवत लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता या दोन्ही रुग्णवाहिका रुग्णसेवेत रुजु झाल्या आहे. या माध्यमातून रुग्णांना मोफत सेवा दिली जाणार आहे.
अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा
एम.ई. एल प्रभागातील इंदिरानगर येथे आयोजित या लोकार्पण कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष जितेश कुळमेथे, सिद्धार्थ मेश्राम, विलास नखाते, विजय पाटील, गणवीर, तापोष डे, महेश चहारे, सिंपल उरकुडे, परशू चव्हाण, मुकेश पुरटकर, बाळू कुळमेथे, एकनाथ मोहितकर, रुपेश मुलकावांर, प्रवीण पचबुधे, विराज सुरपाम, निखिल कोडापे, दिलीप साहू, संतोष साहू, मुन्ना जाधव, चैत्राम ठाकूर, पंकज चटप, नितेश कौरासे, अनिल बडवाईक, मोरेश्वर कुरेकार, आत्माराम खैरे आदींची प्रमूख उपस्थिती होती.
भाग्यजीत बहुउद्देशीय विकास संस्था सामाजिक कार्यात अग्रेसर असुन संस्थेच्या (NGO offering free ambulance service) वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविल्या जात आहे. आता आरोग्य क्षेत्रात सेवा करण्यासाठी संस्थेने पूढाकार घेतला असुन दोन रुग्णवाहिका रुग्णसेवत रुजु करण्यात आल्या आहे.
चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी, स्थानिक गुन्हे शाखेने केली कारवाई
या दोनही रुग्णवाहिकांचे संस्थेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे.
या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, आजचा हा प्रसंग अतिशय महत्त्वाचा आहे. आज एक नव्या जीवनदायी सुविधेचा शुभारंभ होत आहे. आरोग्य ही कोणत्याही समाजाची खरी संपत्ती असते, आणि त्या दृष्टीने ही रुग्णवाहिका सेवा आपल्यासाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.
ही रुग्णवाहिका केवळ आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडणार नाही, तर प्रसूती, अपघात आणि गंभीर (Free ambulance for patients) आजारांमध्येही वेळेवर उपचार मिळवून देण्याचे कार्य करणार आहे. वेळेवर उपचार मिळाले तर अनेक जीव वाचवता येतो त्यामूळे या रुग्णवाहिकांचा मोठा उपयोग रुग्णांना आणि पर्यायाने रुग्णांच्या नातलगांना होणार असल्याचे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.