ganja seized
ganja seized चंद्रपूर जिल्ह्यात यावर्षी गुन्हेगारीने डोके वर काढले, अनेक हत्येचे प्रकरण झाले, गोळीबाराच्या घटना घडल्या, आता या घटना घडू नये यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी कंबर कसली आहे.
15 डिसेंबर रोजी शहर पोलिसांनी गांजा, लोखंडी सुरा एका आरोपिकडून जप्त करीत एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.
त्यांना पोलीस बनायचं होत पण आधी काळ आला, चंद्रपुरात दुर्दैवी घटना
चंद्रपूर शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर द्वारे शहरात गांजा विक्री (ganja seized) एका इसमाद्वारे होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. Chandrapur city police
माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी बिनबा चौक, दर्गा वार्डात 35 वर्षीय शारीक जलील कुरेशी यांच्या घरी धाड मारली.
मंत्रिमंडळातून भाजप जेष्ठ नेते मुनगंटीवार यांना डच्चू
या धाडीत शहर पोलिसांना 93.05 ग्राम गांजा, रोख 3 हजार 900 रुपये, क्यू आर कोड स्टॅण्ड, एक मोबाईल व लोखंडी सुरा असा एकूण 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी शारीक कुरेशी वर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.
सदरची यशस्वी कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रभावती एकुरके चंद्रपुर शहर, सपोनि. राहुल ठेंगणे, पोउपनि. संदिप बच्छीरे, पोउपनि. दत्तात्रय कोलते, पोहवा. कपुरचंद खरवार, म.पो.हवा. भावना रामटेके, पो हवा. इम्रान शेख, सचिन राठोड, पो.अं. इम्रान खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली असून पुढील तपास पो. उप. नि. पल्लवी काकडे करीत आहे.