gautam buddha murti : सावलीतील बुद्ध विहारात बुद्धरुपाची प्रतिष्ठापणा

gautam buddha murti

gautam buddha murti सावली : येथील धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहार सावली येथील बुद्ध विहारात भगवान तथागत गौतम बुद्धाच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या रुपाची प्रतिष्ठापणा शनिवार (दि.३० नोव्हेंबर) रोजी संघारामगिरी येथील वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो व भिक्खुसंघाच्या हस्ते करण्यात आली.


सावली येथील जयभीम वाचनालयाच्या शेजारी मागील काही वर्षांपूर्वी धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहाराचे बांधकाम करण्यात आले. विहाराची निर्मिती झाल्यापासून येथे वर्षावासाच्या काळात नियमीत बुद्ध-धम्म-संघ वंदनेचे पठण करण्यात येत आहे. Buddha murti

पोषण आहाराचा खेळखंडोबा, 103 विद्यार्थ्यांना विषबाधा

येथे नव्यानेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्यामार्फत तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अष्ठधातूची मुर्ती आणण्यात आली. याची प्रतिष्ठापणा वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो, भन्ते सोन, भन्ते बुद्धज्योती यांच्यासह भिक्खू संघांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी बुद्ध-धम्म-संघ वंदनेचे पठण करुन परित्राण पाठ करण्यात आले. त्यानंतर वंदनीय भन्ते ज्ञानज्योती महाथेरो यांच्यासह भिक्खू संघाचे प्रवचन पार पडले. त्यानंतर भीमशक्ती युवा संघटनेतर्फे भोजनदान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. gautam buddha murti

संचालन व आभार समितीचे पदाधिकारी डिलक्स डोहणे यांनी केले. कार्यक्रमाला सावलीच्या नगराध्यक्ष लता लाकडे, बौद्धाचार्य लोमेश खोब्रागडे, बौद्धाचार्य घनश्याम भडके यांच्यासह बौद्ध अनुयायांची प्रमुख उपस्थिती होती.

ईव्हीएम विरोधात चंद्रपुरात बेमुदत आमरण उपोषण

यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष आबाजी दुधे, अरुंधती दुधे, डिलक्स डोहणे, नम्रता डोहणे, प्रदयुत डोहणे, ज्योती बोरकर, वंदना बोरकर, इंद्रजित गेडाम, भुवन बोरकर यांच्यासह धम्मसेनापती सारिपुत्त-महामोग्गलायन बुद्ध विहार समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी प्रयत्न केले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!