Hansraj Ahir statement : हंसराज अहिर यांचं ते वक्तव्य अखेर खरं ठरलं

Hansraj Ahir statement

Hansraj Ahir statement : तत्कालीन केंद्रीय गृह राज्यमंत्री पदावर असतांना हंसराज अहीर यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये ‘देशाअंतर्गत सुरक्षा’ या विषयावर असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया द्वारा आयोजित परिषदेत बोलतांना चीन, पाकिस्तान सारखे बांग्लादेश सुध्दा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेबाबत भविष्यात संभाव्य धोका ठरू शकतो असे अतिशय गंभीर विधान एकंदर परिस्थिती ओळखून केले होते.

बांग्ला देशातील हिंदुवर होत असलेले वाढते हल्ले, अन्याय व अमानुष अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर हंसराज अहीर यांनी तेव्हा केलेले वरील वक्तव्य आज प्रत्यक्षात घडत आहे. बांग्लादेशातील भयावह परिस्थिती पाहता भारतापूढे फार मोठे आव्हान उभे झाले आहे. Hansraj ahir

वेकोली मुख्यालयात हंसराज अहिर यांनी केली महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा

बांग्लादेशात हिंदुंचा अनन्वित छळ होत असून त्यांची घरे जाळली जात आहेत. त्यांच्या संपत्तीची लूट होत आहे. अमानुष अत्याचार, लुटपाट, जबरी धर्मांतरणासारखे प्रकार घडत असल्याने हिंदुंवरील या अन्यायाच्या विरोधात भारतीय हिंदु व अन्य समाज दु:खी असून याचा प्रखर विरोध करीत अनेक हिंदुत्ववादी संघटना व अन्य सामाजिक संघटनाच्या माध्यमातून या अन्यायाविरोधात होणाऱ्या संपूर्ण देशभरात असंतोष व आक्रोश व्यक्त करीत निषेध आंदोलन होत आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!