Human-wildlife conflict tiger
Human-wildlife conflict tiger : चंद्रपूर : २३ डिसेंबरला सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास कापूस वेचणी करीत असताना महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना विरूर स्टेशन वनपरिक्षेत्रातील कविठपेठ येथे घडली.
वच्छलाबाई अर्जुन आत्राम (५९, रा. कविठपेठ) असे मृतक महिलेचे नाव आहे. आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एकूण 29 नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये 27 वाघाच्या, 1 बिबट व एक रानडुक्कर यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.
गडचांदूर पोलिसांचे कौतुकास्पद कार्य
कविठपेठ येथील गणपत आत्राम हे नेहमीप्रमाणे आज (दि. २३) सकाळी ११ वाजताच्या सुमारास कविठपेठ बंजारागुडा शेतशिवारात शेतात बैलबंडीने पत्नी वच्छला, मुलगा, सून व एक मजूर यांना सोबत कापूस वेचणीसाठी गेले होते. वेचणीदरम्यान सदर महिला काही अंतरावर कापूस काढण्याचे काम करत होती. त्यादरम्यान विरूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १३६ जवळ असलेल्या शेतात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून वच्छला आत्राम यांना ठार केले. (Recent tiger attack incidents)
चंद्रपुरात अवघ्या 2 सेकंदात युवकाने चोरला मोबाईल
18 डिसेंबर ला या वनपरिक्षेत्र मध्ये 53 वर्षीय जंगू मारू आत्राम हे कापूस वेचण्याकरिता सकाळी 7 वाजता आपल्या शेतात गेले होते, त्याचक्षणी दबा धरून बसलेल्या वाघाने जंगू वर हल्ला करीत ठार केले, जंगू वर वाघाने हल्ला केला ही बाब कुणालाही कळली नाही, 21 डिसेंबर रोजी मृतकाची बहीण कापूस वेचण्याकरिता शेतात गेली असता तिथे जंगू चा मृतदेह पडून होता, त्यानंतर सदर घटना उघडकीस आली होती. (Tiger attack on humans)
काही दिवसांपूर्वी तेलंगणा राज्यातील थिबेट नामक वाघ महाराष्ट्र राज्यात आला, या वाघाने गोंडपीपरी व राजुरा तालुक्यातील गावात चांगलाच धुमाकूळ घालत अनेक वन्यप्राण्यांना ठार केले, वाघावर नजर ठेवण्यासाठी 8 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते, या दोन्ही घटनेत हल्ला करणारा थिबेट वाघ असू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच विरूर वनपरिक्षेत्र कार्यालयाचे सहायक वनसंरक्षक पी.एन. अवदुतवार यांनी कार्यालयातील क्षेत्रसहायक, वनरक्षक, कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. घटनेचा पुढील तपास मध्यचांदा उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय परिविक्षाधिन वन अधिकारी पवनकुमार जोंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.