Jay Chandrapur
Jay chandrapur चंद्रपूर मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी शनिवारी मुंबई येथील विधानभवनात सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांनी “जय चंद्रपूर” म्हणत आपल्या नावाबरोबर आईचे नाव घेऊन शपथ ग्रहण केली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून ते निवडून आले.
चंद्रपूर बसपा जिल्हाध्यक्ष यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश
आज विशेष अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. किशोर जोरगेवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, “मी किशोर प्रभाताई, गंगूबाई, गजानन जोरगेवार” असे म्हणत शपथ घेतली. त्यांनी “जय हिंद, जय भीम, जय सेवा, जय माता महाकाली, जय चंद्रपूर” असे उद्गार काढत सर्व धर्मीय मतदारांचे आभार मानले. Maharashtra vidhansabha
ते म्हणाले, “चंद्रपूरच्या जनतेने दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. अनेक विकासकामे पूर्ण करण्याचा संकल्प आहे. मागील पाच वर्षांत सुरू केलेले समाजोपयोगी उपक्रम गतीने पुढे न्यायचे आहेत. अभ्यासिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून ती विद्यार्थ्यांसाठी खुली करणे हे प्राथमिक उद्दिष्ट आहे.”
ते पुढे म्हणाले, “मंजूर दीक्षाभूमी विकासकाम, वढा आणि धानोरा बॅरेज यांसारखी प्रकल्पे जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. किशोर जोरगेवार यांच्या शपथविधीने चंद्रपूरच्या जनतेला नवीन आशा दिल्या आहेत.