Kite nylon manja
Kite nylon manja : मकरसंक्रांत जवळ आली की नागरिकांचा गळा कापणारे सिंडिकेट चंद्रपुरात सक्रिय होतात, प्रतिबंधित नायलॉन मांजा ची विक्री करीत आपल्या फायद्यासाठी सामान्य नागरिक व पक्ष्यांचे गळे कापत त्यांचे जीव घेण्याचं काम या दिवसात चालतं.
राज्यात नायलॉन मांजा ची विक्री प्रतिबंधित असताना सुद्धा छुप्या मार्गाने सदर मांजा राज्यात पोहचत आहे, हे सर्व थांबावं यासाठी चंद्रपूर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
वाघांची शिकार करणारी टोळी सक्रिय? चंद्रपुरात 4 वाघनखे जप्त
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रतिबंधित नायलॉन मांजा असा एकूण 24 हजार रुपयांचा माल जप्त करीत एकाला अटक केली आहे.
रयतवारी बीएमटी चौक परिसरात राहणारे 28 वर्षीय श्रावण सविता हा आपल्या राहत्या घरी प्रतिबंधित नायलॉन मांजाची छुप्या पध्दतीने विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.
माहितीच्या आधारे पथकाने धाड मारीत श्रावण यांच्या घरची झडती घेतली असता विविध रंगांच्या चक्रीवर गुंडाळलेला नायलॉन मांजा एकूण किंमत 24 हजार रुपये जप्त करण्यात आले.
आरोपी श्रावण वर कलम 223, 292, 293 सहकलम 5, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकरेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी संतोष येलपुलवार, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार यांनी केली.