Krishi Mahotsav 2024 : चंद्रपुरात भव्य कृषी महोत्सव

Krishi Mahotsav 2024

Krishi Mahotsav 2024 : धनोजे कुणबी समाज मंडळांतर्गत चांदा क्लब ग्राऊंड येथे दिनांक 27, 28 व 29 डिसेंबर 2024 ला कृषी महोत्सव तर दि. 27 व 28 ला धनोजे कुणबी उपवर-वधू परिचय मेळावा आयोजित केला आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेद्वारे आयोजकांनी दिली.

तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम सहित, कृषी महोत्सव, सरपंच परिषद, वधू वर परिचय मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.


शुक्रवार दिनांक 27 डिसेंबरला सकाळी 10.00 वाजता कृषी महोत्सव व उपवर-वधू परिचय मेळावा उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते, उद्घाटक खासदार प्रतिभा धानोरकर, स्वागताध्यक्ष श्रीधर मालेकर, विशेष अतिथी हंसराज अहीर उपस्थित राहणार आहे.

सन्मित्र सैनिक शाळेच्या वार्षिक संमेलनात मोहन भागवंतांची उपस्थिती

याच कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार देवराव भोंगळे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, आमदार संजय देरकर तर विशेष उपस्थितीत आय.ए.एस. डॉ. विजय झाडे, कृषी तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. गजानन सातपुते, बालाजी धोबे, नरेंद्र जिवतोडे, सुधीर सातपुते उपस्थित राहणार आहे.


शनिवार दि. 28 डिसेंबर सकाळी 10.00 वाजता उपवर-वधू परिचय मेळाव्याला अध्यक्षस्थानी डॉ. अशोक जीवतोडे तर उद्घाटक आमदार सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आमदार सुधाकर अडबाले, वामनराव चटप, सुभाष धोटे, सुदर्शन निमकर, अँड. संजय धोटे उपस्थित राहणार आहे. याच दिवशी द्वितीय सत्रात उद्योजकता मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश राजुरकर, मार्गदर्शक रामभाऊ मुसळे, सुभाष देवाळकर, संजय ढवस, आशिष खुलसंगे, सुनिल मुसळे उपस्थित राहणार आहे. 29 डिसेंबरला सकाळी 10 वाजता अमृत महोत्सवी ज्येष्ठांचा सत्कार आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीधर मालेकर, स्वागताध्यक्ष सरदार पावडे, उद्घाटक लक्ष्मण गमे उपस्थित राहतील. (Krishi Mahotsav events)

दुपारच्या सत्रात सरपंच परिषद कार्यक्रमात अध्यक्ष नरेशबाबु पुगलिया, स्वागताध्यक्ष अँड. पुरुषोत्तम सातपुते राहतील. सत्कारमूर्ती आमदार कीर्तिकुमार भांगडिया,आमदार करण देवतळे, शंकर तोटावार, डॉ. सुमंत पांडे, दत्ता पाटील, अश्विनी कुलकर्णी, संजिव निकम, राजेंद्र कराळे,देवा पाचभाई, संदीप गि-हे उपस्थित राहणार आहे. (Agriculture workshops at Krishi Mahotsav)

मेळावा आयोजनाचा उद्देश हा की, समाज बांधव एकत्र येऊन समाजसंघटन वाढावे. आधुनिक शेतhविषयक तंत्रज्ञान व शेतीविषयक माहिती प्राप्त व्हावी शिवाय उपवर-वधूंना योग्य जोडीदार मिळावा. सदर तीन दिवसीय कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मेळावा पदाधिकारी व कार्यकारिणी यांने केले आहे.


आयोजित पत्रकार परिषदेला अँड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधर मालेकर, विलास माथनकर, अतुल देऊळकर, विनोद पिंपळशेंडे, अरुण मालेकर, भाऊराव झाडे, सुधाकर काकडे, प्रा. अनिल डहाके, प्रा. नामदेव मोरे्, रणजीत डवरे, सुधाकर जोगी, देवराव सोनपित्रे, निळकंठ पावडे, महेश खंगार, मनिषा बोबडे, सरदार पावडे उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!