Vadhu var parichay melava : उप वर-वधु परिचय मेळाव्यात विवाह करुन समाजासमोर आदर्श मांडा – खासदार प्रतिभा धानोरकर

Vadhu var parichay melava

Vadhu var parichay melava : चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर धनोजे कुणबी समाजाच्या (Dhanoje kunbi samaj) वतीने आयोजित उप वर-वधू परिचय मेळावा व कृषी मेळाव्याचे उद्घाटन 27 डिसेंबर 2024 रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.

चंद्रपुरात पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाचा करार

या उद्घाटन सोहळ्यात खासदार धानोरकर यांनी समाजाच्या भूमिका जागतिक स्तरावर मांडण्याची महत्त्वाची गरज व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, भविष्यातील परिचय मेळाव्यांमध्ये केवळ परिचय करणे नाही, तर विवाह देखील पार पडले पाहिजे, जेणेकरून समाजात आदर्श निर्माण होईल.

कृषी मेळाव्याच्या संदर्भात त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन घेण्याची प्रेरणा दिली आणि तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन केले. या उद्घाटनावेळी समाजाची कृतज्ञता व्यक्त करताना खासदार धानोरकर म्हणाल्या, “समाजाने मला बरेच काही दिले आहे, आणि मी सदैव ऋणी आहे.”

यावेळी मंचावर आमदार देवराव भोंगळे, आमदार संजय देरकर, धनोजे कुणबी समाजाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तमराव सातपूते, श्री. मालेकर, डॉ. विजय झाडे, विलास माथनकर, मनोहर पाऊनकर, राहूल पावडे, गजानन सातपुते, सुनंदा धोबे, सुनिता लोढीया, उमाकांत धांडे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!