Chandrapur Crime Rate : चंद्रपूर आता “मिर्झापूर’

Chandrapur Crime Rate

Chandrapur Crime Rate चंद्रपूर जिल्ह्यात वर्ष 2024 हे गोळीबार व अनेक हत्येच्या गुन्ह्यामुळे हादरले आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर पोलीस दलाने आतापर्यंत असंख्य अवैध शस्त्र जप्त केले असले तरी आजही जिल्ह्यात शस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात बहुरीया हत्याकांड नंतर जिल्ह्यात गोळीबार व हत्येचे सत्र सुरू झाले होते ते आजही सुरूच आहे. जिल्हा हळूहळू गुन्हेगारीच्या मिर्झापूर च्या वळणावर येऊन पोहचला आहे. Chandrapur Crime Rate

नुकतेच चंद्रपूर शहर पोलिसांनी दोघांची हत्या करण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला अटक केली होती, दोन दिवसांनी आता बल्लारपूर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 5 आरोपीना अटक केली असून त्यांच्याजवळून 3 देशी बनावटीच्या पिस्टल व 18 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.


बल्लारपूर पोलिसांनी उल्लेखनिय कामगिरी बजावत तीन अग्नीशस्त्र आणि १८ जिवंत काडतूस जप्त करण्याची मोठी कारवाई केली. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपी विरुद्ध आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी आज बुधवार 4 डिसेंबर रोजी केली. या कारवाई मुळे गुन्हेगारी प्रवृत्तीचे कंबरडे मोडले आहे. Chandrapur crime news

Chandrapur crime news
5 आरोपी अटकेत


घटनेतील अटक करण्यात आलेल्या आरोपींचे मुकेश उर्फ मुक्कु विश्वनाथ हलदर ( २८ ),अमित दिलीप चक्रवती ( 34 ) दोन्ही रा.साईबाबा वॉर्ड बल्लारपूर,जितेंद्रसिंग उर्फ निक्कु गोविंदसिंग डिलोन ( २९ ) रा.शिवनगर वार्ड,संघर्ष उर्फ गोलू बंडू रामटेके ( २७ ) रा.संतोषीमाता वार्ड व काश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी ( २0 ) रा.फुकटनगर बामणी ता.बल्लारपूर असे नाव आहे. सदर आरोपींच्या ताब्यातून तीन देशी बनावटीच्या पिस्तूल आणि तब्बल १८ जिवंत काडतूस पोलिसांनी जप्त केला आहे.याची किंमत अंदाजे ९७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

चंद्रपुरात उजळली भूकंपाच्या धक्क्याची सकाळ


बल्लारपूर शहरातील गुन्हेगारी आटोक्यात यावी म्हणून पोलीस विभाग सतर्कतेने कारवाई करत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे पाळेमुळे खोदून गुंडांना धडा शिकविण्याच्या अनुषंगाने मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने आज मोठी कारवाई बल्लारपूर पोलिसांनी केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध पोलिसांनी आर्म अॅक्ट च्या कलम 3/ 25 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. Chandrapur crime news

मागील गुन्ह्याचा काही संबंध?

याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांनी माहिती दिली की यापूर्वी जिल्ह्यात गोळीबार व अग्निशस्त्रांच्या ज्या घटना घडल्या त्यामध्ये या आरोपींचा काही सहभाग आहे का याबाबत पुढील तपास केला जाणार, या बंदुका कशासाठी आणल्या? याचा तपास सध्या सुरू आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, राजुरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दिपक साखरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!