maharashtra Cm swearing ceremony : ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हा

maharashtra Cm swearing ceremony

maharashtra Cm swearing ceremony भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या सौजन्याने भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महापालिकेच्या पटांगणावर एलईडी स्क्रीनवर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात घटलं कांग्रेसचे मताधिक्य

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या ते गोपनीयतेची शपथ घेतील, असे चित्र आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी चंद्रपूरातही तयारी सुरू करण्यात आली असून शहरातील गांधी चौक येथे एलईडी स्क्रीनवर सदर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे. Devendra fadanvis

चंद्रपुरात भूकंप, सकाळी हादरे

यावेळी भारतीय जनता पक्ष आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच लाडू वाटप करून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे.

संध्याकाळी ४ वाजतापासून सदर कार्यक्रमाला सुरुवात होणार असून नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!