Matdarancha Kaul : चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचे मताधिक्य का घटले?

Matdarancha Kaul

Matdarancha kaul चंद्रपूर – दर 5 वर्षांनी देशातील नागरिक लोकशाहीच्या राष्ट्रीय उत्सवात आपला अधिकार वापरीत देश व राज्यातील शासन निवडतात, मात्र वर्ष 2024 मध्ये तब्बल 2 वेळा मतदारांनी आपला कौल बदलला आहे.

आपण नजर टाकूया चंद्रपूर लोकसभा व जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवर लोकसभेत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी घवघवीत यश मिळविले मात्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेसचा लाजिरवाणा पराभव झाला, लोकसभेत मतदारांनी कांग्रेसला पाठबळ दिलं तर विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारांनी पाठिंबा देत भरघोस मतदान केलं. Matdarancha Kaul

लोकसभा निवडणूकित भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांचा 2 लाख 60 हजार मतांनी पराभव झाला, लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवार यांनी पराभवाची हॅट्रिक मारली.

मात्र भाजपने विधानसभा निवडणुकीत पराभवाचा वचपा काढत विजय मिळविला, जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी 5 जागेवर भाजपने विजय मिळविला.

चंद्रपूर जिल्ह्यात सकाळी भूकंपाचे हादरे

लोकसभा निवडणुकीत कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांना राजुरा विधानसभा क्षेत्रातून 1 लाख 30 हजार 554 मते, चंद्रपूर मधून 1 लाख 19 हजार 811, बल्लारपूर – 1 लाख 21 हजार 652, वरोरा – 1 लाख 4 हजार 752 मते मिळाली मात्र ही मते विधानसभा निवडणुकीत कांग्रेसच्या वाट्याला आली नाही. Voting 2024

विधानसभा निवडणुकीत काय स्थिती?

चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांना 1 लाख 6 हजार 841 मते तर कांग्रेसचे प्रवीण पडवेकर यांना 84 हजार 37 मते, भाजपचे जोरगेवार यांचा 22 हजार 804 मतांनी विजय झाला, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला 38 हजार 927 मतांचे मताधिक्य होते.

राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे देवराव भोंगळे यांना 72 हजार 882 तर कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली, कांग्रेसचा 3 हजार 54 मतांनी पराभव झाला, लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला 58 हजार 903 मतांचे मताधिक्य होते. Matdarancha Kaul

सॉरी शब्दाचा अर्थ काय?

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते मिळाली तर कांग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली, या निवडणुकीत कांग्रेसचा 25 हजार 985 मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला बल्लारपूर मधून 48 हजार 200 मतांचं मताधिक्य होत.

वरोरा विधानसभा क्षेत्रातून कांग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला, भाजपचे करण देवतळे यांना 65 हजार 170 मते तर कांग्रेसचे प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मते मिळाली, कांग्रेसचा 40 हजार 122 मतांनी पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत कांग्रेसला वरोरा विधानसभा मतदारसंघातुन 37 हजार 50 मतांचे मताधिक्य होते.

लोकसभा निवडणुकीत कांग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात भाजपची दाणादाण केली मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपने कांग्रेस पक्षाची दाणादाण केली, अवघ्या 6 महिन्यात असं काय घडलं की मतदारांनी कांग्रेस पक्षाला नाकारत भाजपला साथ दिली.

कांग्रेस हवेत

कांग्रेस पक्षाला चंद्रपूर जिल्ह्यात अच्छे दिन असताना विधानसभा निवडणुकीत बुरे दिन चा सामना करावा लागला कारण लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाने कांग्रेस पक्ष हवेत होता, कुठलाही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला तर विजय आपलाच असा अतिआत्मविश्वास कांग्रेसला जडला होता, मात्र मतदारांनी कांग्रेस पक्षाला आस्मान दाखविले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!