Model on rain water harvesting
Model on rain water harvesting चंद्रपूर महानगरपालिका स्कॉच सिल्वर पुरस्काराने सन्मानित झाली असुन शहरात मोठ्या प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टींग होऊन शहराच्या भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी मनपाने केलेल्या प्रयत्नांची एकप्रकारे देशपातळीवर दखल घेतली गेली आहे.
ओमॅट वेस्ट लिमिटेड कंपनी विरुद्ध आमदार अडबाले आक्रमक
दिल्ली येथे झालेल्या मोठया कार्यक्रमात स्कॉच ग्रुपचे चेअरमन समीर कोचर व व्हाइस चेअरमन गुरुशरण सिंग धंजल यांच्या हस्ते मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त मंगेश खवले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी चंद्रपूर शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करिता सहकार्य करणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था व नागरिकांचे आभार मानले. rain water harvesting
चंद्रपूर मनपाद्वारे रेन वॉटर हार्वेस्टींग करण्यास मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आहे. हार्वेस्टींगचे स्वेच्छेने काम करणारे 31 जलमित्र नेमून सिल्वर जलमित्र, गोल्डन जलमित्र, डायमंड जलमित्र व नगर जलमित्र असे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
वॉर्डसखींद्वारे घरोघरी माहितीपत्रक देणे तसेच विहीर / बोअरवेल असलेल्या घरी दंडाच्या नोटीस सुद्धा बजावण्यात आल्या. हार्वेस्टींग करण्यास घराच्या छताच्या क्षेत्रफळानुसार 5,7 व 10 हजार रुपये अनुदान मनपातर्फे दिले जाते तसेच पुढील 3 वर्षे मालमत्ता करात 2 टक्के सूट सुद्धा देण्यात येत आहे. नविन बांधकाम करण्यास परवानगी घेणाऱ्या बांधकामधारकांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे सक्तीचे करण्यात येऊन इतर सर्व माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात आली व मनपाच्या या प्रयत्नांची दखल सदर संस्थेने घेतली होती. Model on rain water harvesting
स्कॉच ग्रुप ही 1997 पासून भारतातील अग्रगण्य पूर्ण सेवा सल्लागार फर्म आहे. या फर्मचे संशोधन अहवाल व शिफारसींची दखल उच्च पातळीवर घेतली जाते. विविध क्षेत्रातील जसे की प्रशासन, वित्त, बँकिंग, तंत्रज्ञान आणि कॉर्पोरेट नागरिकत्व यातील उत्कृष्ट कार्यासाठी ही संस्था ओळखल्या जाते. भारतातील विविध क्षेत्रातील वैशिष्ट्यपुर्ण कार्यांसाठी बेंच मार्क म्हणून या संस्थेचे कार्य ओळखले जाते.
स्कॉच ग्रुप द्वारे 2003 मध्ये स्थापित, हा पुरस्कार,एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेने केलेले प्रत्यक्ष कार्य व त्याबद्दलच्या पुराव्यांचा वापर करून समाजाला त्याचा काय फायदा झाला याचे आकलन करतो व केवळ योग्य व्यक्ती आणि संस्थांना त्यांच्या राष्ट्र उभारणीतील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जाईल हे सुनिश्चित करतो.