murder case
murder case 🙁गुरू गुरनुले) मूल: वारंवार त्रास देणाऱ्या युवकाला काही युवकांनी चाकूने सपासप वार करून निघृन हत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी(दि.२८) रात्री १०.३० वाजता दरम्यान शहरातील पंचायत समिती कार्यालयासमोर घडली. घटनेने मूल शहरात दहशत पसरली.
रितिक अनिल शेंडे वय (२४ वर्ष) वार्ड क्रमांक १६ विहिरगाव असे मृत युवकांचे नाव आहे. राहुल सत्तन पासवान (२० वर्ष),अजय गोटेफोडे(२२ वर्ष) व 1 विधिसंघर्ष बालक सहित तिघांना अटक केली असून हत्या प्रकरणात 1 आरोपी फरार असल्याची माहिती आहे.
ग्रामीण भागातील कलावंतांनी तयार केला मराठी चित्रपट काजू
रितीक शेंडे हा पंचायत समिती कार्यालयासमोरील बसस्थानकाजवळ दुचाकीवर भ्रमणध्वनीवर बोलत असताना अचानक आरोपी युवकांनी रितिकच्या छातीवर,पोटावर व कंबरेवर सपासप वार केले, अचानक झालेल्या या हल्ल्यात रितीक रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.
आरोपी यावरच थांबले नाही तर रस्त्याने येजा करणाऱ्या नागरिकांना चाकू दाखवून ”चले जाओ नहीं तो हम तुम्हे भी खतम कर देंगे” अशी चेतावणी दिली.भीतीने जवळपास असलेले नागरिक तहसील कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये गेले.मात्र रीतिकला वाचवायला कुणीही धावून गेले नाही.
रितीक ला मारल्यांनंतर आरोपीनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप आगडे यांनी रीतिकला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून रितिकला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागरिकानी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती.
घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक दिनकर ठोसरे दाखल होत त्यांनी पंचनामा केला, आरोपीना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कसोशीने प्रयत्न करीत राहुल पासवान, अजय गोटेफोडे व विधिसंघर्ष बालकाला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली. Chandrapur crime news
घटना कशी घडली?
मृतक रितीक शेंडे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता, रितीक गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याने तो वारंवार राहुल पासवान ला धमकी देत त्रास द्यायचा, रितीक वारंवार त्रास देतो म्हणून राहुल ने हा त्रास कायमचा सम्पविण्याचा निर्णय केला व यामध्ये आपल्या मित्रांची साथ घेत 27 डिसेंबर रोजी रितीक वर चाकूने वार करीत त्याची हत्या केली. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली.
शहर कडकडीत बंद
रितीक च्या हत्येनंतर मूल शहरातील नागरिकांनी आरोपीना तात्काळ अटक व्हावी यासाठी बाजारपेठ बंद पाडली. व्यापाऱ्यांनी नागरिकांनी पुकारलेल्या बंद ला पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली.
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (crime branch) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीना अटक व्हावी यासाठी ताबडतोब कारवाई करीत पथके तयार केली व 24 तासांच्या आत आरोपीना अटक केली. या प्रकरणातील 1 आरोपी अद्याप पसार आहे.
आरोपीवर कलम 103 (1), 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करीत मूल पोलीसांच्या ताब्यात दिले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली. (Murder case)
प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मूल पोलीस करीत आहे.