Nylon kite manja
Nylon kite manja : चंद्रपूर – मकरसंक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पतंग प्रेमींनी आकाशात पतंग उडविणे सुरू केले आहे, पण यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा वापरण्याचा ट्रेंड मोठ्या जोरात सुरू आहे.
फिरायला गेले आणि 50 हजार गमावून बसले
या प्रतिबंधित मांजाने नागरिकांचे गळा चिरण्याचे प्रकार, पशु पक्षांच्या जीवितास धोका निर्माण होतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील मकरसंक्रांत सणात या घटनांना आळा बसावा यासाठी चंद्रपूर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई सुरू केली आहे.
22 डिसेंबर रोजी शहरातील सेंट मायकल शाळेजवळ अष्टविनायक पतंग सेंटर मधून प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री होत असल्याची माहिती रामनगर पोलिसांना ( ram nagar police ) मिळाली होती.
पोलिसांनी माहितीच्या आधारे नियोजनबद्ध पद्धतीने अष्टविनायक पतंग सेंटरमध्ये धाड मारली असता गौरव हेमराज गोटेफोडे हा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करीत होता.
पोलिसांनी मारलेल्या धाडीत नायलॉन मांजाचे 104 बंडल एकूण किंमत 1 लाख 23 हजार 800 रुपयांचा माल जप्त करीत गौरव गोटेफोडे ला ताब्यात घेण्यात आले.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक देवाजी नरोटे, हिमांशू उगले, पोलीस कर्मचारी आनंद खरात, सचिन गुरनुले, लालू यादव, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, रविकुमार ढेंगळे, संदीप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, अमित, ब्ल्यूटी साखरे यांनी केली.