operation muskaan | चंद्रपूर पोलिसांचे ‘ऑपरेशन मुस्कान” यशस्वी

operation muskaan

operation muskaan : ऑपरेशन मुस्कान, ज्याला सामान्यतः ऑपरेशन स्माईल असेही संबोधले जाते, हा गृह मंत्रालयाने (MHA) सुरू केलेला प्रकल्प आहे. हरवलेल्या मुलांचा शोध घेणे आणि त्यांचे योग्य पुनर्वसन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ही मोहीम महिनाभर चालवली जाते, त्यादरम्यान राज्य पोलिसांचे कर्मचारी हरवलेल्या मुलांची ओळख पटवण्यासाठी, त्यांची सुटका करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्यासाठी विविध उपाययोजना करतात.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेत गोंधळ, उत्तरात झाला बदल

1 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2024 या कालावधीत चंद्रपूर पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान मोहीम राबवित बेपत्ता मुले, महिला, पळविलेली मुले, मुली यांच्या शोध घेत जिल्ह्यातील 210 मुले, मुली आणि महिला पुरुषांचा यशस्वी पणे शोध लावला.

या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंधक कक्षाने यशस्वी कामगिरी बजावली.

अमित शाह विरोधात युवासेनेचे आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या (chandrapur police) पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता व पळविलेल्या महिला, मुली व मुले व पुरुष यांच्याबाबत माहिती घेत पोलीस पथकाने 133 महिला आणि 71 पुरुष यासोबत जिल्ह्यातील पळविलेल्या पैकी 1 मुलगा व 5 मुलींचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.

महत्वाची बाब म्हणजे वर्ष 2016 व 2017 मध्ये हरविलेल्या 2 तरुणींचा या मोहिमेत शोध घेण्यात पोलीस दल यशस्वी ठरले.

सदरची यशस्वी मोहीम अप्पर पोलीस अधीक्षक व प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी सह स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन अधिकारी यांनी मोलाची कामगिरी बजावली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!