Police teamwork examples
Police teamwork examples : कायद्याच्या विरोधात काम करणाऱ्या पोलिसांचे अनेक उदाहरणे पुढे येतात मात्र कायद्यात राहून माणुसकी साठी काम करणारे पोलीस हे क्वचितचं आहे, असेच माणुसकीचे कार्य गडचांदूर पोलिसांच्या हातून घडले.
अवघ्या 2 सेकंदात चोरट्याने मोबाईल लांबविला
23 डिसेंबर रोजी मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास भोयेगाव-गडचांदूर मार्गावर कोळसा वाहतूक करणारा ट्रक क्रमांक MH34 BG 6749 हा उलटला, ट्रक उलटल्यावर क्लिनर मनीष पांडे हा बाहेर पडला मात्र ट्रक चे संपूर्ण केबिन चालक रवि प्रसाद यांच्या अंगावर पडले.
एका बाजूला जमीन तर दुसऱ्या बाजूला ट्रक च्या केबिन चा भार रवी प्रसाद च्या अंगावर होता, रात्रीचे 2 वाजले मदतीला येईल तरी कोण? अशी चिंता क्लिनर पांडे यांना लागली, त्यांनी याबाबत तात्काळ गडचांदूर पोलिसांसोबत संपर्क साधत माहिती दिली.
विशेष बाब म्हणजे माहिती मिळाल्यावर पोलीस काही क्षणात घटनास्थळी दाखल झाले.
ट्रक चे केबिन चालकाच्या अंगावर होते तो त्यामध्ये अडकून पडला होता, पोलिसांनी वाहन चालकाचा जीव वाचविण्यासाठी घटनास्थळी हायड्रा व क्रेन बोलावली.
पोलिसांनी ट्रक चे केबिन कापण्यास सुरुवात केली, तब्बल 2 तास शर्थीचे प्रयत्न करीत पोलीसांनी चालक रवी प्रसाद याला सुखरूप बाहेर काढले. (Good policing examples)
चालक प्रसाद याला तात्काळ गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले, सध्या रवी प्रसाद यांची प्रकृती उत्तम आहे, चालक प्रसाद यांचे प्राण वाचविल्याबद्दल त्यांनी गडचांदूर पोलिसांचे आभार मानले.
सदर यशस्वी बचाव मोहीम पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अनिल कुंभरे, वाहतूक पोलीस शिपाई सुभाष तिवारी, रामसिंग पवार, खंडू मुंडकर, गोविंद सुरणार, साईनाथ उपरे, बंडू महात्मे, प्रकाश बाजीगर व सिद्धार्थ रणवीर यांनी केली.