pratibha dhanorkar on setu worker
pratibha dhanorkar on setu worker : महाराष्ट्रातील सर्व तहसिल कार्यालयात अनेक बेरोजगारानां अत्यल्प मानधनावर कामकरावे लागत असल्याने त्यांना शासनाने कंत्राटी सेवेत सामावून किमान वेतन देण्याची मागणी खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेद्र फडणविस (devendra fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
चंद्रपुरातील बुलेट राजांवर होणार कठोर कारवाई
प्रत्येक तहसिल कार्यालयात सेतुची कामे बेरोजगार तरुण तरुणी मार्फत अत्यल्प मानधनावर केली जात आहे. सेतु केंद्रामार्फत दिले जाणारे दाखले व प्रमाणपत्र देण्याचे काम या सबंधीत कर्मचाऱ्याकडे आहे.
पंरतु या कर्मचाऱ्याना अत्यल्प मानधन मिळत असल्याने या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांची भेट घेवुन आपल्या मागण्या मांडल्या या संदर्भात खा. प्रतिभा धानोरकर यांनी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना पत्र लिहुन सेतु कार्यालयातील अत्यल्प मानधन असलेल्या कर्मचाऱ्याना शासकीय कंत्राटी सेवेत सामावुन घेवून किमान वेतन देण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात मा. खा. प्रतिभा धानोरकर या मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेणार असल्याचे देखिल सांगितले.