Road development
Road development चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितिन गडकरी केंद्रीय रस्ते विकास निधी अंतर्गत रस्ता विकासाकरीता निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील माढेळी, येवती, केळी, नागरी, उमरी, तुमगांव ते राज्य मार्ग 331 प्रजिमा 2 किमी 0/00 ते 19/100 ची सुधारणा करण्याकरीता 23 कोटी रुपयांची तसेच वरोरा तालुक्यातील प्रजिमा 1 ते जळका नागरी ते चिकणी ते शेगाव खुर्द ते चंदनखेडा रस्ता प्रजिमा 5 किमी 0/00 ते 17/500 या रस्ताची सुधारणा करणे.
BH SERIES च्या क्रमांकाची नंबर प्लेट कुणाला मिळते?
(प्रजिमा 1 ते टेमुर्डा) या रस्त्याची सुधारणा करण्याकरीता 20 कोटी रुपयांची, असे एकुण 43 कोटी रुपयांचा निधी केंद्रीय रस्ता विकास निधी अंतर्गत मंजुर करुन द्यावा, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितिन गडकरी(road development minister) यांची भेट घेऊन केली. यावेळी मंत्री महोदय यांनी या संदर्भात लवकरच कार्यवाही करुन निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले.