ramnagar police station chandrapur
ramnagar police station chandrapur रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 2 वेगवेगळ्या कारवाईत 5 दुचाकी सहित 2 अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे.
पहिल्या कारवाईत 30 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजता चंद्रपूर वडगाव येथील निवासी 31 वर्षीय निखिल ठोंबरे यांनी आपली मोपेड दुचाकी क्रमांक MH34 A N 7130 ही स्वतःच्या किराणा दुकानासमोर ठेवली असता कुणीतरी अज्ञाताने चोरून नेली, याबाबत ठोंबरे यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला, परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करीत फुटेज व तांत्रिकदृष्ट्या तपास केला, खबरी नेटवर्क ला ऍक्टिव्ह करीत गुन्हे शोध पथकाने आरोपी 22 वर्षीय चेतन आगडे रा. जटपुरा गेट याला अटक करीत चोरी केलेली दुचाकी वाहन जप्त करण्यात आले.
आरोपी आगडे ची कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळून काळ्या रंगाचे स्प्लेंडर वाहन क्रमांक mh34 t 872 व काळ्या रंगाचे पॅशन प्लस वाहन करमणुक mh34 an 4877 जप्त करण्यात आले. दोन्ही वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. ramnagar police station chandrapur
ईव्हीएम मशीन विरोधात चंद्रपुरात आमरण उपोषण
दुसऱ्या गुन्ह्यात राधिका सभागृह तुकुम जवळ राहणारे 23 वर्षीय पंकज जैन यांनी 1 डिसेंबर रोजी युनियन बँकेच्या पार्किंग मध्ये आपले दुचाकी वाहन क्रमांक MH33 CC 7461 ठेवली असता अज्ञाताने सदर वाहन चोरी केले अशी तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली.
याबाबत पंकज जैन यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, गुन्हे शोध पथकाने तक्रारीची दखल घेत तपास सुरू केला, गुन्हे शोध पथकाने कौशल्यपूर्ण तपास करीत गोपनीय माहिती मिळवत 33 वर्षीय आरोपी कपिल मेश्राम राहणार परिवर्तन चौक, फुकटनगर याला अटक केली.
आरोपी मेश्राम ची कसून चौकशी केली असता त्यांच्याजवळून काळ्या पांढऱ्या रंगांची इलेक्ट्रिक मोपेड वाहन जप्त करण्यात आले, दोन्ही गुन्ह्यात 5 दुचाकी सहित एकूण 1 लाख 84 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Chandrapur police
दोन्ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध प्रमुख सपोनि देवाजी नरोटे, सपोनि उगले, पोलीस कर्मचारी पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात, प्रशांत शेंदरे, लालू यादव, मनीषा मोरे, अमोल गिरडकर, हिरालाल गुप्ता, रविकुमार ढेंगळे, प्रफुल पुप्पलवार, संदीप कामडी, पंकज ठोंबरे व ब्युल्टी साखरे यांनी केली.