Save Bangladeshi hindus
Save Bangladeshi Hindus बांगलादेशातील हिंदू, सिख, बौध्द, जैन, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजावर इस्लामिक अतिरेक्यांनी मागील अनेक महिन्यापासून अत्याचार सुरु केले.
ज्यात हल्ले, हत्या, लुटमार, जाळपोळ आणि महिलांचा अमानुष छळ, हिंदू आणि अल्पसंख्यांकांच्या धर्मिक स्थळांची विटंबना सुरु केली आहे. या घटना रोखण्यासाठी योग्य ती पावेल उचलण्या ऐवजी सद्याचे बांगलादेश सरकार व इतर संबधित यंत्रणा मूक प्रेक्षक बनून राहिल्या आहेत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी लोकशाही पद्धतीने आवाज उठवण्याचा अवलंब केला तेव्हा अन्याय आणि अत्याचाराचा एक नवीन टप्पा दिसून येतो आहे. Save Bangladeshi Hindus

हिंदुच्या अशा शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या इस्कॉनचे संन्यासी पूज्य श्री चिन्मय कृष्ण दास जी यांना बांगलादेश सरकारने अटक करणे अन्यायकारक आहे.
त्या बेपत्ता व्यापारी महिलेची हत्या, आरोपी पोलीस कर्मचारी
या गंभीर प्रसंगी भारत सरकार व आंतरराष्ट्रीय संस्थांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून ते एकटे नसून संपूर्ण जग त्यांच्या पाठीशी आहे हा भाव व्यक्त करण्याकरीता चंद्रपुरात मंगळवारी 10 डिसेंबरला दुपारी 2.30 वाजता भव्य न्याय यात्रा काढण्यात आली. Nyay yatra
या न्याय यात्रेत चंद्रपूर जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने नागरीक महिला वर्ग उपस्थित होते. विविध समाजतील समाज बांधव, अल्पसंख्याक समाजातील धर्मगुरू, जेष्ठनागरिक , महिला वर्ग व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर ,आ.किशोर जोरगेवार या न्याय यात्रेत सहभागी झाले होते.

न्याय यात्रा हि गांधी चौक येथून निघून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता झाली. निवासी जिल्हाधिकारी यांना सकल हिंदू समाज, चंद्रपूर तर्फे निवेदन देण्यात देण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक दीपक जी तामशेट्टीवार ,जिल्हा संघचालक तुषार जी देवपूजारी,तालुका संघचालक लक्ष्मण ओलालवार, नगर संघचालक रवींद्रजी भागवत, शीख समाजाचे चमकौर सिंग, बौद्ध समाजाचे धम्म् म भन्ते जी, इस्कॉन चे रमेश जी बिराजदार, स्नेहाताई मिसार, प्राजक्ता भालेकर ताई, अशोक जीवतोडे, शैलेश जी बागला, शवारकरी चे मेश्राम हे उपस्थित होते.
सकल हिंदू समाजाच्या प्रमुख मागण्या
बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध तेथील सरकारला भारत सरकारकडून कठोर इशारा दिला जावा, मानवाधिकारवादी संघटनांनी हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकावरील हल्ल्याची, अत्याचाराची दखल घेऊन हा मुद्दा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर लावून धरावा, बांगलादेशातील हिंदूंच्या जीविताचे आणि संपत्तीचे रक्षण तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना पायबंद घातला जावा, sakal hindu samaj
इस्कॉनचे साधू चिन्मय कृष्णदास यांची तुरुंगातून तत्काळ स-सन्मान मुक्तता करण्यात यावी, हिंदू कलाकार, व्यावसायिक, उद्योगपती, खेळाडू, राजकीय नेते तसेच हिंदू मंदिरांना सुरक्षा पुरविली जावी, बांगलादेशातील पाकिस्तानी जिहाद्यांच्या हस्तक्षेपाला पायबंद घालावा, sakal hindu samaj

संयुक्त राष्ट्रसंघात हिंदू, बौद्ध, खिश्चन व अन्य अल्पसंख्यकांवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला जावा, बांगलादेशातील अल्पसंख्य समाजाच्या रक्षणाची मागणी करणाऱ्या देशोदेशीच्या विविध आंदोलनांना सुरक्षा प्रदान केली जावी, इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा – आ. किशोर जोरगेवार
हिंदू समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या घटना केवळ हिंदू समाजाचाच नव्हे तर मानवतेचा अपमान आहेत. हिंदू धर्म हा सहिष्णुता, शांती आणि सह-अस्तित्वाच्या मूल्यांचा प्रचार करणारा धर्म आहे. परंतु, बांगलादेशातील काही विघातक शक्ती या मूल्यांना पायदळी तुडवत आहेत. Save Bangladeshi Hindus
मंदिरे उद्ध्वस्त केली जात आहेत, निष्पाप नागरिकांवर हल्ले केले जात असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. हे सर्व मानवी हक्कांच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांच्या पूर्णतः विरोधात असून, हिंदू समाजावरील हल्ल्यांविरोधात एकजूट होऊन मानवतेच्या रक्षणाचा निर्धार करा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.
बांगलादेश येथे हिंदू समाजातील नागरिकांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या विरोधात आज चंद्रपूरात सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश हिंदू न्याय यात्रा काढण्यात आला होता. यात भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सहभाग नोंदवत बांगलादेशातील घटनेचा निषेध केला.
दुपारी तीन वाजता शहरातील गांधी चौक येथून या न्याय यात्रेला सुरुवात झाली. सदर यात्रा घोषणा देत शहराच्या मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आम्ही इथे एकत्र येऊन या घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करत आहोत. बांगलादेश सरकारने त्वरित पावले उचलून या घटनांना आळा घालावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच या देशातील हिंदू बांधवांना सुरक्षा आणि सन्मानाने जगण्यासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून दिले जावे,” असे ते यावेळी म्हणाले.