sudhir mungantiwar on santosh deshmukh | बीड मध्ये जी घटना घडली ती भविष्यात.. सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar on santosh deshmukh

sudhir mungantiwar on santosh deshmukh राज्यात सध्या चर्चेत असलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध होत असून या घटना पुन्हा घडू नये यासाठी येणाऱ्या अधिवेशनात अशासकीय विधेयक मांडत मी सरपंच बंधू-भगिनींचा आवाज बुलंद करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी दिली.

नवीन वर्षाचे स्वागत करताना ही चूक करू नका

चंद्रपुरात धनोजे कुणबी समाजातर्फे 3 दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यामध्ये राज्यात सरपंचावर होत असलेल्या हल्ल्यावर प्रकाश टाकण्यात आला.

बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली त्यानंतर सलग 2 सरपंचावर हल्ला करण्यात आला होता.


यावर आता माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बीड जिल्ह्यातील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी मार्च मधील विधानसभेच्या अधिवेशनात सरपंचांना सुरक्षा पुरविण्यात यावी त्यांच्या कार्यकाळात कसलीही अप्रिय घटना घडू नये असे कायदे अस्तित्वात आणण्यासाठी अशासकीय विधेयक मी मांडणार अशी प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. राज्यातील सरपंच बंधू-भगिनींच्या पाठीशी मी पूर्ण ताकदीनिशी उभा राहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!