Mi Punha Yein : त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी पुन्हा येईन

Mi Punha Yein


Mi punha yein त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी व त्यांना मारण्यासाठी मी पुन्हा येईन, हे वाक्य पोलिसांच्या अटकेत असलेल्या आरोपीने म्हटले आहे. अटकेत असलेल्या आरोपीला दोघीजनांनी कुटुंबासमोर मारहाण केली, त्यामुळे त्याचा अपमान झाला, या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपीने बंदूक व 4 जिवंत राउंड सह चंद्रपूर गाठले मात्र काही करण्यापूर्वी चंद्रपूर शहर पोलिसांनी त्याला अटक केली.

आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची सुवर्णसंधी


विशेष बाब म्हणजे रील मध्ये नेहमी उशिरा येणारी पोलीस रिअल आयुष्यात गुन्हा घडण्याच्या आधी धडकत आरोपीला अटक केली. Mi punha yein

आरोपी हा 2 वर्षांपूर्वी कारागृहातून पे रोल वर बाहेर आला होता, मात्र कारागृहात परतला नाही, मागील 2 वर्षांपासून आरोपी पसार होता.
53 वर्षीय कन्हैया उर्फ मुन्ना ठाकूर रघुनाथ सिंग राठोड असे आरोपीचे नाव आहे.


काही दिवसांपूर्वी आरोपीचे ओम नगर रयतवारी भागात दोघासोबत वाद झाला वादाचे रूपांतर मारहाणीत झाले, यावेळी दोघांनी कन्हैया ला त्याच्या कुटुंबासमोर बेदम मारहाण केली, त्यामुळे परिवारासमोर मारहाण केल्याचा राग कन्हैया च्या मनात राहिला, त्याने त्या दोघांना संपविण्याचा निर्धार केला, यासाठी उत्तर प्रदेश मधून आरोपी कन्हैया ने देशी कट्टा व जिवंत काडतुसे आणली.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प येथे प्रकल्प व्यवस्थापकाची पदभरती


1 डिसेंबर रोजी हत्यार सोबत घेऊन आरोपी दोघांचा शोध घेत महाकाली कॉलरी परिसरात आला, यावेळी शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला एक इसम जवळ देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली, गुन्हे शोध पथकाने तात्काळ महाकाली कॉलरी परिसरात पोहचत आरोपी कन्हैया ला अटक केली. Chandrapur police


त्याला याबाबत कारण विचारले असता त्याने कुटुंबासमोर मारहाण झाल्याने त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी दोघांचा गेम करण्यासाठी आलो आहे असे सांगितले, आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, ओम नगर डीआरसी हेल्थ क्लब जवळ तो वास्तव्यास होता, मात्र वाद झाल्यावर व कारागृहातून पे रोल वर बाहेर आल्यावर तो बल्लारपूर शहरात मुक्कामी होता. Chandrapur police


2 वर्षांपासून कन्हैया रामनगर पोलिसांना चकवा देत होता पण शहर पोलिसांच्या सतर्कतेने आरोपी कन्हैया ला अटक केली.

मुद्देमाल किती?


आरोपी जवळून बंदूक व 4 जिवंत राउंड जप्त करण्यात आले.बुलेटचे समोरील टोकावर तांब्याची व अॅल्युमिनियम धातुचे आवरण असलेले, बुलेटचे मागचे बाजुला 9MM 2291 KF असे इंग्रजीत लिहलेले आहे. पोलिसांनी एकूण 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

chandrapur city police news
गुन्हा घडण्यापूर्वी आरोपी कन्हैया ला अटक

त्यांना सोडणार नाही


पोलिसांनी पकडल्यावर आरोपी कन्हैया म्हणाला की ज्यादिवशी मी बाहेर आलो तर दोघांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रपूर शहर पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेपणामुळे दोघांचा जीव वाचला. Chandrapur police


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली पोउपनी संदीप बच्छीरे, पोहवा सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, नापोका कपुरचंद खैरवार, पोका ईम्रान खान, राजेश चिताडे, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, शाबाज सैय्यद, सारीका गोरकार यांनी केली आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!