DBATU University
Dbatu university DBATU रायगड विद्यापीठ अंतर्गत राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय चंद्रपूर येथे कित्येकदा विद्यार्थ्याना विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे व महाविद्यालयाच्या निष्काळजीपणामुळे नेहमी त्रासाला समोर जावे लागत असते.
मागील वेळी सुद्धा निलेश बेलखेडे यांच्या तत्परतेने व सहकार्याने शेकडो विद्यार्थ्याचें वार्षिक नुकसान वाचले होते, विद्यार्थ्यांना सहकार्य करणारे व त्त्यांच्या पाठीशी सदैव खंबीरपने उभे राहणारे व्यक्तिमत्व म्हणून युवकांमध्ये एक वेगळी ओळख असणार नेतृत्व युवासेना सचिव, सिनेट सदस्य इंजि.निलेश बेलखेडे यांची पुन्हा एकदा तत्परतेने सहकार्य करणार व्यक्तिमत्व व कार्य करण्याची शैली बघायला आली. Dbatu university
विधानसभेच्या सभागृहात दणाणला जय चंद्रपूर चा नारा
राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय मध्ये 2024 सत्रात उत्तीर्ण झालेली चव्हाण नामक विदयार्थीनी ला पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये नौकरी लागली परंतु विद्यार्थिनी उत्तीर्ण होऊनही सहाव्या सेमिस्टर ची मार्कशीट मिळुनही तिची पाचव्या सेमिस्टर ची पास ची मार्कशीट अद्यापही महाविद्यालय येथे मिळालेली नव्हती.
वारंवार महाविद्यालय येथे जाऊन विचारपूस करूनही ही चुकी विद्यापीठाची असून आम्ही प्रयत्न करीत आहो, काही दिवसात येऊन जाईल असे उत्तरे महाविद्यालय प्रशासन यांच्याकडुन येत होते. परंतु 10 दिवसात नौकरी लागलेल्या कंपनी ला सर्व मार्कशिट्स न पाठविल्यास नौकरी पासून वंचित राहावे लागेल असा निरोप आल्यानंतर विदयार्थीनीच्या पालकांनी बल्लारपूर शिवसेना नगरसेवक,उपजिल्हा प्रमुख सिक्की भैया यादव यांच्या माध्यमातून निलेश बेलखेडे यांच्याशी बोलून सदर विषय सांगितला. Shivsena ubt
विषयांचे गांभीर्य ओळखून निलेश बेलखेडे यांनी महाविद्यालय प्राचार्य, प्रशासन यांच्याशी दूरध्वनी वर बोलून विचारणा केली असता आम्ही प्रयत्न करून थकलो परंतु विद्यापीठाकडून पाहिजे तसं सहकार्य नाही.
असे उत्तरे मिळाले असता बेलखेडे यांनी थेट रायगड येथील DBATU विद्यापीठाच्या मुख्य शाखा येथे कुलगुरू, परीक्षा निमंत्रक अधिकारी यांच्याशी बोलण करून शिवसेना च्या पद्धतीने दम दिला व वारंवार विदयार्थ्याच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही अशे खडसावून यापुढे विदयापीठाच्या नागपूर कार्यालयाला घेराव घालून बंद पाडू असा इशारा दिला. Shivsena ubt
त्यानंतर विद्यापीठाद्वारे लगेच अवघ्या 1 तासामध्ये विद्यार्थिनी ची पाचव्या सेमिस्टर ची मार्कशीट शिवसेना युवासेना पूर्व विदर्भ सचिव, सिनेट सदस्य सचिव निलेशजी बेलखेडे यांच्या व्हाट्सअँप नंबर वर पाठविली व दिलगिरी व्यक्त करत यापुढे चुका होणार नाही याची काळजी घेऊ असा विश्वास दिला.
अश्या रीतीने सहकार्य करीत निलेश बेलखेडे यांनी विदयार्थी व पालकांना ती मार्कशीट पाठवून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थीनीच्या पालकांनी आनंद व्यक्त करीत इतक्या तत्परतेने काम करून सहकार्य केल्यामुळे पत्र लिहून शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )युवासेना व युवासेना पूर्व विदर्भ सचिव प्रा. निलेश बेलखेडे यांचे विशेष आभार मानले.
इतक्या तत्परतेने मदत करून त्या विद्यार्थिनीची पहिलीच नौकरी वाचवून तिच्यासाठी निलेश बेलखेडे हे देवदूत ठरले त्यांच्या या शिक्षण क्षेत्रातील सेवा भावी वृतीचे सर्वाकडून अभिनंदन केल्या जात आहे.