water pump motor
Water pump motor शेत शिवारात रात्री पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आवश्यक असते ते मोटार पंप मात्र आता त्या पंपावर सुद्धा चोरांचा डोळा आहे.
नांदगाव पोडे या भागात शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरी होत असल्याच्या तक्रारी शहर पोलिसांना प्राप्त झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी (chandrapur city police) तपास करीत 3 आरोपीना अटक करीत मोटार पंप जप्त केले.
खासदार धानोरकर यांनी दिला मदतीचा हात
नांदगाव पोडे येथे शेतशिवारात शेतीला पाणी देण्यासाठी लावण्यात आलेले मोटार पंप चोरी होत होते.
याबाबत चंद्रपूर शहर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पोलिसांनी गुन्हे दाखल करीत तपास सुरू केला असता रात्रीच्या सुमारास लालपेठ परिसरातील काही मुले फिरताना दिसले.
महाकाली मंदिर परिसराच्या मागे आढळला महिलेचा मृतदेह
पोलिसांनी 19 वर्षीय लोकेश उर्फ शालू पिंकू चव्हाण, 19 वर्षीय सलमान साहेबअली शेख व 18 वर्षीय प्रेम दीपक उपरकर तिघे राहणार लालपेठ जुनी वस्ती परिसर यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी शेत शिवारातून मोटार पंप चोरी केली असल्याची कबुली दिली. Water pump motor
मोटार पंपाचे काय करीत होते?
शहर पोलिसांनी मोटार पंप चोरी प्रकरणात तिघांना अटक केली, सदर गुन्हा तिघांनी संगनमत करून केला होता.
चोरी केलेले मोटार पंप फोडून त्यामधील तांब्याचे तार वेगळे करून ते विक्री करणार होते, लपवलेले मोटार पंप व तांबे पोलिसांनी जप्त केले.
तांब्याचा भाव 700 ते 800 रुपये kg असा बाजारभाव आहे, झटपट पैसे कमविण्याच्या नादात 18 व 19 वर्षे वयाच्या आरोपीनी गुन्हेगारीचा उंबरठा पार केला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोष कुमार कनकम, कपूरचंद खैरवार, इम्रान खान, राजेश चिताडे, रुपेश रणदिवे, दिलीप कुसराम, विक्रम मेश्राम व इर्शाद खान यांनी केली.