Bhaigiri : चंद्रपुरात वाढलं भाईगिरीचे ट्रेंड

Bhaigiri

bhaigiri चार चौघात आपली दहशत रहावी यासाठी सर्वत्र भाईगिरी चा ट्रेंड सुरू झाला आहे, मुंबई, नागपूर नंतर हा ट्रेंड चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.

दारूबंदी च्या काळात बल्लारपूर शहरातील मध्यभागी एक हत्याकांड घडलं आणि त्यांनतर चंद्रपुरात सुरू झालं गुन्हेगारीचे मिर्झापुर, आज हत्या करणं हे अत्याधिक सोपं झालं असल्याचे बघायला मिळत आहे. bhaigiri

आज जिल्ह्यात गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडे शस्त्र हे सहजरित्या उपलब्ध होते, तलवार, कोयता व आता बंदूकची ट्रेंड या निमित्ताने वाढले, तलवार व कोयत्याने जीवघेणा हल्ला तर कुणाला संपवायचं झालं तर बंदूक.

चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व्यापारी मागील 10 दिवसापासून बेपत्ता

बंदूक तर सोप्या रीतीने उपलब्ध व्हायला लागली आहे, चंद्रपूर शहरात 2 दिवसांपूर्वी पोलीस अटकेपासून फरार असलेल्या गुन्हेगाराने दोघांना संपविण्यासाठी बंदूक घेऊन आला होता, त्यांनतर बल्लारपूर येथे 3 बंदुकीसह 18 काडतुसे व 5 आरोपीना अटक करण्यात आली, आता चंद्रपूर शहरातील पडोली येथे एका कडून बंदुकीसह 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. Bhaigiri status

चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अवैध धंदे, अवैध शस्त्र व प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवित आहे, यादरम्यान स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाला युवकाजवळ बंदूक असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे 28 वर्षीय राकेश चंद्रय्या माटला रा. टिळकनगर आमराई वार्ड घुग्गुस याला पडोली येथील मुख्य चौकात नाकाबंदी करीत अटक करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हा बनतोय गुन्हेगारीचे मिर्झापुर

पोलिसांनी राकेश ची झडती घेतली असता त्याच्या जवळून देशी बनावटीची पिस्टल व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली, आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. Bhaigiri status

आरोपीवर पडोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, नितेश महात्मे, दीपक डोंगरे, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, संतोष एलपूलवार, गोपाळ आतकुलवार, गोपीनाथ नरोटे व दिनेश अराडे यांनी केली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!