Unauthorized banner hoarding
Unauthorized banner hoarding : चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील विना परवानगी होर्डिंग, बॅनर, जाहीरात फलक उभारणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले असुन अनधिकृत होर्डींगसाठी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत राजकीय पक्ष प्रतिनिधी व बॅनर छापणाऱ्या प्रिंटर्सना सोमवार ३१ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत मनपा प्रशासनाद्वारे अवगत करण्यात आले.
घाटकोपर येथील होर्डींग दुर्घटनेनंतर सुस्वराज फाऊंडेशनची दाखल जनहित याचिका क्र.१५५ / २०११ नुसार मा.उच्च न्यायालयाने शहरातील अनधिकृत होर्डींग,बॅनर, जाहीरात फलकांवर सक्त कारवाई निर्देश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने पोलीस विभाग व मनपा प्रशासनाद्वारे मनपा क्षेत्रातील प्रिंटर्स व राजकीय पक्ष प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यात आयुक्त यांनी संबंधितांना मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत अवगत केले व शहरात कुठलेही अवैध बॅनर,जाहीरात फलक,होर्डिंग लाऊ नये अन्यथा न्यायालयीन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची कल्पना दिली.
अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर, फलक पालिका करणार जप्त असून गुन्हाही दाखल केला जाणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज तपासणीसाठी क्यूआर कोड देण्यात आला आहे. तो क्यूआर कोड नसेल तर कारवाई होणार आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या सहभागासाठी वॉर्ड निहाय समिती सुद्धा स्थापन केली जाणार असुन तक्रार करण्यास वेबसाईट तसेच संपर्क क्रमांक मनपातर्फे (chandrapur mahanagar palika) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अनधिकृत बॅनर,पोस्टर्स होर्डींग वर निष्कासनाची कारवाई करण्यासाठी स्थानिक पोलीस प्रश्न यांनी पुरेसे संरक्षण उपलब्ध करून देण्याचे तसेच आवश्यकता असल्यास हत्यारबंद पोलीस देखील पुरविण्याचे न्यायालयाने आदेशित केले आहे.
चंद्रपुरात नागरिकांचे गळे कापणारे सक्रिय
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,उपायुक्त मंगेश खवले,रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा,सिटी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके,दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक लता वाढीवे,सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,संतोष गर्गेलवार, अनिलकुमार घुले तसेच राजकीय पक्षांचे व प्रिंटिंग प्रेसचे प्रतिनिधी उपस्थीत होते.