Amit shah controversy : चंद्रपुरात अमित शाह विरोधात कांग्रेसचा निषेध मोर्चा

Amit shah controversy

Amit shah controversy : आंबेडकर, आंबेडकर हे नाव घेणं आता फॅशन झाली आहे, देवाचे नाव घेतलं असत तर तुम्हाला स्वर्ग भेटला असता, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या या विधानाने देशात वादंग सुरू झालं.


अमित शाह यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, (amit shah on ambedkar) यासाठी शाह यांनी देशातील जनतेची माफी मागत आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी कांग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आजच्या निषेध मोर्च्यात केली.

चंद्रपुरात गोवंश जनावरांची तस्करी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी संसदेत गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा निषेध करण्यासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आणि मित्र पक्षांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी (२४ डिसेंबर) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून मोर्चास प्रारंभ झाला. (Chandrapur congress morcha)

या मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध फ्रंटल संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत मोर्चा पार पडला. सहभागी झालेल्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर माफी मागण्याची तसेच त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली.

चंद्रपूर पोलिसांना मिळाला जल्लाद

मोर्चामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सहभाग घेतला.
मोर्चादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी शाह यांच्या विधानाचा तीव्र निषेध करत देशातील लोकशाही व घटनात्मक मुल्यांचे रक्षण करण्यासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!