kesh shilpi karj yojana
kesh shilpi karj yojana : नाभिक समाजासाठी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाच्या माध्यमातून केशशिल्पी कर्ज योजना (kesh shilpi karj yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नाभिक समाजाने घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळ, चंद्रपूरचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
ओबीसी मंत्रालयाची स्थापना करा : खासदार प्रतिभा धानोरकर
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळाकडे संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची स्थापना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 5 जानेवारी, 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. या महामंडळाचे कामकाज महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामडंळामार्फत कार्यान्वीत करण्यात आले आहे.
या आहेत कर्ज योजना:
1 लक्षपर्यंतची थेट कर्ज योजना:
शासनाने इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील (nabhik samaj yojana) व्यक्तींना स्वयंरोजगार व लघुउद्योग सुरू करण्याकरिता 1 लक्ष रुपयाची निरंक व्याजदर असलेली थेट कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्ष असावे. कर्ज परतफेडीचा कालावधी 4 वर्षापर्यंतचा असून नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये मुद्दल रु. 2,085 परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत झालेल्या हप्त्यांवर द.सा.द.शे. 4 टक्के व्याज आकारण्यात येईल. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापर्यंत असावे.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:
उद्देश: महाराष्ट्र राज्यातील नाभिक समाजातील गरजू व कुशल व्यक्तींना कृषी संलग्न व पारंपारिक उपक्रम, लघुउद्योग व मध्यम उद्योग, उत्पादन, व्यापार व विक्री, सेवा क्षेत्र आदी व्यवसायाकरिता कर्ज व्याज परतावा उपलब्ध करून देणे.
योजनेचे स्वरूप:बँकेमार्फत लाभार्थींना रु. 10 लाखापर्यंत कर्ज (loan scheme) वितरीत केले जाईल. कर्ज रकमेचे हप्ते नियमित भरल्यास व्याजाची रक्कम (12 टक्केच्या मर्यादेत) व्याजपरतावा रक्कम अनुदान स्वरूपात बँक प्रमाणिकरणानुसार लाभार्थ्याच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षे असावे तसेच कुटुंबातील उत्पन्नाची वार्षिक मर्यादा रु. 8 लाखापर्यंत आहे. ही योजना संपूर्णपणे संगणीकृत असून महामंडळाचे वेब पोर्टल www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी व अर्ज सादर करणे अनिवार्य राहील.
शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना:
उद्देश: इतर मागास प्रवर्गातील नाभिक समाजातील विद्यार्थ्यांकरीता उच्च शिक्षणासाठी राज्य, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकरिता नाभिक समाजातील विद्यार्थ्यांना बँकेमार्फत उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक कर्ज रकमेवरील व्याजाचा परतावा करणे.
योजनेचे स्वरूप: राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 10 लाखापर्यंत असेल. परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रु. 20 लाखापर्यंत राहील.
लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती:
अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्ष असावे. अर्जदार इतर मागास प्रवर्गातील तसेच महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रु. 8 लाखापर्यंत असावे. अर्जदार 12 वीत 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असावा. तसेच पदवीच्या द्वितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणासह पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराचा सिबिल क्रेडिट स्कोर 0-1, (म्हणजेच यापूर्वी कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा अधिक असावा. हि योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जाऊन भरावे.
5 लक्षपर्यंतची 20 टक्के बीज भांडवल योजना:
बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु. 5 लाखापर्यंतच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय तसेच पारंपारिक लघु व सेवा उद्योगासाठी महामंडळामार्फत कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्य देण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या 5 टक्के लाभार्थी, 20 टक्के महामंडळ व 75 टक्के बँकेचा सहभाग आहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर 6 टक्के व्याजदर असून बँकेच्या कर्ज रकमेवर बँकेचा व्याजदर लागू राहील. कर्जाची परतफेड 5 वर्षापर्यंत करता येईल. सदर योजनेत अर्जदाराचे वय 18 ते 55 वर्षे असावे व कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1 लाखापर्यंत असावी.