A notorious criminal
A notorious criminal : राजुरा, बल्लारपूर व चंद्रपूर शहरात घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या हाती लागले आहे. दुर्गापूर वेकोलि क्षेत्रातील मेन स्टोर मधून आरोपीनी तांब्याचा तार चोरी केला होता त्या गुन्ह्याचा तपास करतेवेळी विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारे आरोपी अट्टल गुन्हेगार दुर्गापूर पोलिसांच्या हाती लागले आहे.
२४ जानेवारीला दुर्गापूर वेकोलि क्षेत्रातील मेन स्टोर मधून ७० हजार रुपयांचे तांब्याचा इलेकट्रीक केबल चोरी झाला होता. वेकोलि तर्फे याबाबत पोलीस स्टेशन दुर्गापूर येथे फिर्याद नोंदविण्यात आली होती.
पोलीस निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात गुन्ह्याचा तपास सुरु झाला, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली. आरोपीबाबत गोपनीय माहिती घेत पोलिसांनी १९ वर्षीय प्रिन्स उर्फ कालू संग्राम बहुरिया राहणार बल्लारपूर, २१ वर्षीय प्रफुल उर्फ दाद्या वामन कुकडे राहणार राजुरा, १८ वर्षीय दिलीप उर्फ नेपाळी रामचंद्र निषाद राहणार बल्लारपूर यांना अटक करण्यात आली.
आरोपीकडून चोरी गेलेला माल सहित मोबाईल व दुचाकी असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विशेष बाब म्हणजे अटकेतील आरोपींवर घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहे.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात दुर्गापूर पोलीस स्टेशन निरीक्षक लता वाडिवे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी योगेश शार्दूल, मोरेश्वर गोरे, प्रमोद डोंगरे, मंगेश शेंडे, किशोर वलके, संपत पुलीपाका यांनी केली.