Aurobindo Realty road closure
Aurobindo Realty road closure : अरबिंदो रिअॅलिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रशासनाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणायां मौजा किलोनी, बेलोरा, जेना, इजिमा 16 येथील रस्ते रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने खोदुन बंद केले त्यामुळे सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
तसेच रस्ता बंद झालयाने परिसरातील शेतकयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या संदर्भात, भद्रावती पंस माजी अध्यक्ष प्रविण ठेंगणे तसेच बेलोरा ग्रामवासियांनी पत्रकार परिषदेत रस्ता दुरुस्त करून पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परीषदेच्या माध्यमातुन जिला प्रशासन आणि कंपनी प्रशासनाला दिला आहे. (road closure impact on farmers)
चंद्रपूर जिल्ह्यात वाळू तस्करांची मुजोरी, तलाठ्याच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न
ठेंगणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 29 जानेवारीच्या रात्री 1.30 वाजता अरबिंदो कंपनीने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या ठरावाचे आणि टाकळी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचे उल्लंघन करून हा रस्ता बेकायदेशीरपणे खोदून बंद केला आहे. त्यामुळे किलोनी, बेलोरा, टाकळी, जेना, पानवडाळा, कांसा येथील ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त शेतक_यांमध्ये अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Kiloni Belora road dispute)
याशिवाय, कंपनी प्रशासनाने केलेल्या बेकायदेशीर उत्खननामुळे आणि संबंधित रस्त्यावरील जड वाहतुकीमुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहेत. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा आणि ग्रामपंचायत टाकळी मासिक सभेचा ठराव अंमलात आणला जात नाही, प्रकल्पात प्रस्तावित असलेली संपूर्ण शेती जमीन संपादित केली जात नाही, बेलोरा गावाचे पुनर्वसन केले जाणार नाही आणि प्रकल्पामुळे बाधित झालेल्या लोकांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार नाही तोपर्यंत कंपनी प्रशासनाला रस्ता वळवण्याची परवानगी देऊ नये आणि रस्ता वळवण्याची प्रक्रिया त्वरित रद्द करण्याची मागणी बेलोरा ग्रामवासियांनी केली आहे.
दरम्यान, कंपनी प्रशासनाने बुधवार 29 जानेवारी रोजी मध्यरात्री 1.30 वाजता मौजा किलोनी, बेलोरा, जेना इंजिमा 16 येथील रस्ता बेकायदेशीरपणे खोदला आहे, ज्यामुळे सार्वजनिक रस्ताचे नुकसान होऊन तो रस्ता बंद करण्यात आला आहे. यामुळे संबंधित गावातील लोकांना ये-जा करण्यात अनावश्यक अडचणी येत आहेत. प्रकल्पग्रस्त ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि ग्रामस्थांच्या स्वाक्षरी ने प्रकल्पग्रस्त समितीने सदर रस्ता दुरुस्त करून पुन्हा सुरू करावा आणि योग्य चौकशी करावी अशी मागणी करून कंपनी प्रशासनाविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरोरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे केली आहे. (village road dispute Chandrapur)
स्थानिक जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि बांधकाम विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल न घेतल्यास आणि सुरू असलेले काम न थांबविल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकल्पग्रस्त समितीने दिला आहे. आंदोलन दरम्यान कंपनीचे काही नुकसान झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद बांधकाम विभाग प्रशासन आणि कंपनी प्रशासनाची असेल असा ही इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेला भद्रावती पंचायत समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण ठेंगणे, प्रकल्पग्रस्त समिती सदस्य, जेना संगीता सुरेश देहारकर (सरपंच ग्रामपंचायत टाकळी), प्रदीप शंकर महाकुलकर (सरपंच गाव पानवडाळा), प्रभा मोतीराम बोढाले (सरपंच ग्रामपंचायत जेना), हेमंत धानोरकर, हरिचंद्र आसुटकर, बंटी पांडिले, प्रशांत मत्ते, मनोज मत्ते, विलास परचाके, ईश्वर उताने, नीलेश उत्ताणे आणि अनेक प्रकल्पग्रस्त, शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्पग्रस्त समिती सदस्य उपस्थित होते.