Bear attack incidents : चंद्रपूर जिल्हा चारही बाजूने वन क्षेत्राने व्याप्त असल्याने सतत जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना घडत आहे. वन्य प्राणी जंगलातील अधिवास सोडून शहरी भागात येत असल्याने मानवी जीवनाला आता धोका निर्माण होत आहे.
चंद्रपुरातील थर्मल पॉवर स्टेशन मधील अल्ट्राटेक ऐश लोडींग प्लांट जवळ २० जानेवारीला वाहन चालकावर २ अस्वलीनी हल्ला केला हि घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली, या हल्ल्यात वाहनचालक ५ २ वर्षीय रघुनाथ यादव जखमी झाला आहे.
सकाळी रघुनाथ यादव हे झुडपी भागात शौचासाठी गेले होते त्यावेळी अचानक २ अस्वलीनी त्यांच्यावर हल्ला केला, अचानक झालेल्या या हल्ल्याने यादव घाबरून गेले, त्यांनी काही वेळ अस्वलाचा प्रतिकार करीत आरडाओरड सुरु केल्याने कामगार वर्गाने तात्काळ यादव यांच्याकडे धाव घेतली. कामगार वर्ग आल्याने अस्वलीनी पळ काढला.
सीएसटीपीएस मध्ये दररोज असंख्य वाहने येतात मात्र ऐश प्लांट येथे वाहन चालकांसाठी शौचालयाची व्यवस्था नाही, त्यामुळे हे चालक झुडपी भागात शौच करण्याकरिता जात असल्याने त्याठिकाणी प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून यामुळे हा हल्ला झाला असल्याचे बोलले जात आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी नायगमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सीएसटीपीएस मध्ये अस्वलांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे, या भागात सीसीटीव्ही लावण्यात आला आहे मात्र अस्वल सीसीटीव्ही दिसून येतात, मागील २ महिन्यात तिघांवर अस्वलीने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेले वाहनचालक रघुनाथ यादव यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सीएसटीपीएस मध्ये वनविभागाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे.