Bhik Mango Andolan। कांग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे भीक मांगो आंदोलन

Bhik Mango Andolan

Bhik Mango Andolan : ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य नागरीकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागत आहे. या विरोधात भारतीय राष्ट्रीस काँग्रेस कमेटीच्या चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक विभागाद्वारा मा.सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भिंक मांगो आंदोलन करण्यात आले.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अनेक वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याची बाब अनेक वर्तमान पत्रात प्रसिध्दीस आली. एक्स-रे मशिन सुविधा, एम.आर.आय. सुविधा, सिटी स्कॅन या सुविधा योग्य वेळी मिळत नसल्याने या विरोधात चंद्रपूर जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाने भिक मांगो आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.

पूजा केटरर्स वर चंद्रपूर मनपाची दंडात्मक कारवाई

यावेळी प्राप्त निधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयात जमा करण्यात आली व समस्यांच्या संदर्भाने जिल्हाधिकारी तसचे, खासदारांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनातून रुग्णांना सर्व अत्याधुनिक सुविधा तात्काळ पुरविण्याची विनंती करण्यात आली. अन्यथा भविष्यात या संदर्भाने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या पत्रातून देण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व सोहेल रजा यांनी केले.

कांग्रेस

यावेळी, गोपाल अमृतकर, प्रविण पडवेकर, प्रशांत भारती, चंदा वैरागडे, राहूल चौधरी, सचिन रामटेके, मुन्नी बाजी, शोभा वाघमारे, सिरीन कुरेशी, रामकृष्ण कोंड्रा, अंकित रामटेके, रमिज शेख, शहजाद अहमद, आमिर शेख, सादिक शेख, शकील सुफी व इतर पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!