road accident news
road accident news : 31 डिसेंबर ला रात्री 10 वाजताच्या सुमारास चंद्रपूर-नागपूर मार्गावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
नातेवाईकांची भेट घेत वाटेतील हॉटेलात जेवण करीत वणी आपल्या स्वगावी जाणाऱ्या नागपूरे कुटुंबावर घात झाला.
सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती, एकीकडे वणी येथील नागपुरे कुटुंब भद्रावती येथील नातेवाईकांच्या घरी भेटीसाठी आली, भेट आटोपल्यावर नागपुरे कुटुंब आपल्या दुचाकी क्रमांक MH29 A Z 9949 ने परतीच्या प्रवासावर निघाले.
नागरिकांचा गळा कापण्यासाठी जिल्ह्यात आला प्रतिबंधित नायलॉन मांजा
जाण्यापूर्वी हॉटेलात जेवण केल्यावर चंद्रपूर-नागपूर हायवेवरील डॉली पेट्रोल पंप जवळ यु टर्न घेताना MH40 AK 2095 या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी जोरदार होती की यामध्ये 51 वर्षीय सतीश भाऊराव नागपुरे, 47 वर्षीय मंजुषा सतीश नागपुरे यांचा जागीच मृत्यू झाला तर 2 वर्षीय माहिरा राहुल नागपुरे या बालिकेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. Road accident news
अपघातात 7 वर्षीय स्मायली कामतवार ही मुलगी किरकोळ जखमी झाली.
अपघातानंतर ट्रक चालक नंदू चव्हाण याला पोलिसांनी अटक केली.
एकीकडे नविन वर्षाच्या स्वागतासाठी नागरिक सज्ज होते तर या दिवसात अप्रिय घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त लावला होता.
तरीसुद्धा दुर्दैवाने हा अपघात घडला या अपघातामुळे नागपुरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.