BJP convention shirdi | भाजपचे महाधिवेशन, चंद्रपुरातील कार्यकर्ते शिर्डीला रवाना

BJP convention shirdi

BJP convention shirdi : शिर्डी येथे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र महाअधिवेशन होणार असून, आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरमधील भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते शिर्डीकडे रवाना झाले आहेत. या प्रवासासाठी पाच बस आणि चारचाकी वाहने यांचा वापर करण्यात आला असून, सर्व कार्यकर्ते शिर्डीत दाखल होणार आहेत.

अंमली पदार्थ विरोधात आमदार आक्रमक

  रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या महाअधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. चंद्रपूरमधील कार्यकर्त्यांनी प्रचंड ऊर्जा, राष्ट्रसेवेची बांधिलकी आणि दृढ संकल्पाने या प्रवासाला सुरुवात केली आहे. या प्रवासात महिला, पुरुष, युवा, तसेच वरिष्ठ कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शिस्तबद्ध संघटन, देशसेवा, आणि एकात्मतेच्या भावनेने प्रेरित हे कार्यकर्ते शिर्डीकडे मार्गक्रमण करत आहेत. (Bjp chandrapur)

महाअधिवेशनात पक्षाच्या धोरणांचा आढावा घेऊन आगामी दिशा ठरवली जाणार आहे. यामध्ये कार्यकर्त्यांसाठी संघटनात्मक बळकटीवर मार्गदर्शन, आगामी निवडणुकांसाठी रणनीती ठरवणे, तसेच जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी नव्या उपक्रमांची चर्चा होणार आहे.

चंद्रपुरातील मालमत्ता धारकांना सवलत जाहीर

चंद्रपूर मतदारसंघातील कार्यकर्ते पक्षाच्या उद्दिष्टांसाठी सतत तत्पर असतात आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे पक्षसंघटना अधिक बळकट होत आहे. “या महाअधिवेशनातून नव्या दिशा मिळतील असे मत आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!