Bjp Paksh Pravesh | आमदार जोरगेवार यांच्या हस्ते असंख्य युवकांचा भाजपात प्रवेश

Bjp Paksh Pravesh

Bjp Paksh Pravesh : भारतीय जनता पक्ष हा देशाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्य आणि  देश विकासाच्या नवीन शिखरांवर पोहोचत आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे भारत जागतिक स्तरावर एका शक्तिशाली राष्ट्राच्या रूपात उभा आहे.

पडोली चौकात उड्डाणपुलाची खासदार धानोरकर यांनी केली मागणी

यात कार्यकर्त्यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. आपण पक्षाची खरी ताकद असून हा पक्ष प्रवेश कार्यक्रम राष्ट्रसेवेचा संकल्प मजबूत करण्याचा सोहळा असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंचशील वॉर्ड येथे पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विजय चंदावार, मंडळ अध्यक्ष रवी लोणकर, माजी नगरसेविका छबू वैरागडे, हेल्पिंग हॅन्ड चे अध्यक्ष अजय दुर्गे, अक्षय घोटेकर, सुनिल सुर्यवंशी, सोनु माहोरकर, राजु माहोरकर, सोनु रायपूरे, साहिल समुंद, राजू धनराज, चांद चिताडे, पराग मेलोडे, सुबोध चिकटे आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. नागरिकांना पक्षाचे विचार पटत असून हेच विचार पुढील काळात पुन्हा आपल्याला प्रत्येक घरी पोहोचवायचे आहेत. आजच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमाने पक्षाची ताकद वाढणार आहे.

सोबतच नवीन सदस्यांवरही आता पक्षवाढीसाठी काम करण्याची जबाबदारी असणार आहे. या पाच वर्षांत अनेक विकासकामे आपल्याला करायची आहेत. ही करत असताना आपल्या प्रभागातील कामे आपल्या माध्यमातून पोहोचावीत, असे आवाहनही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

भारतीय जनता पक्षाने नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम केले आहे. गरिबांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भाजपची बांधिलकी आहे.

आपली निष्ठा, आपले कर्तृत्व, आणि आपले योगदान पक्षाला अधिक बळकट करेल. आपण केवळ पक्षाचे सदस्य होणार नाही, तर देशाच्या प्रगतीचा एक भाग बनणार आहात. आपली प्रत्येक कृती ही देशहितासाठी असावी, आपल्या कार्यातून लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे.

आपण पक्षाच्या विचारधारेला प्रामाणिकपणे पुढे घेऊन जा, पक्षाचा विस्तार करत आपल्या मेहनतीतून पक्षाला अधिक बळकट करा, असे आवाहन यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. स्थानिक नागरिकांचीही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!