Bodybuilding Championship 2025
Bodybuilding Championship 2025 : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दुर्गापुरातील कोल प्रदूषणावर संतापले सुधीर मुनगंटीवार
या अंतर्गत शनिवारी विदर्भस्तरीय बॉडी बिल्डिंग अजिंक्यपद स्पर्धा गांधी चौकातील महापालिकेच्या पटांगणावर संध्याकाळी पाच वाजता होणार आहे. या स्पर्धेत विदर्भातील 100 हून अधिक बॉडी बिल्डर्स सहभाग घेत आहेत.
हरियाणाचे मिस्टर वर्ल्ड नरेंद्र यादव हे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असतील. स्पर्धेतील विजेत्यांना आमदार श्री 2025 पुरस्काराचे रोख 55,555, बेस्ट पोझरला 33,333, तर बेस्ट इम्प्रूव्हला 22,222 आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवात कुस्ती, कबड्डी, बॉडी बिल्डिंग अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन मिळून युवकांना प्रेरणा मिळणार आहे.