Bear In City | चंद्रपुरात झोमॅटो डिलिव्हरी बॉयचा अस्वल सोबत सामना

Bear In City

Bear In City : जंगल क्षेत्र कमी पडत असल्याने वन्यप्राणी आता शहराकडे आपला अधिवास शोधत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहचला आहे.

3 जानेवारीला चंद्रपूर शहरातील बागला चौकात अस्वलीने दर्शन दिले, मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटांनी बागला चौकात असंख्य कुत्रे भुंकत होते, त्यावेळी झोमॅटो डिलिव्हरी बॉय बाबूपेठ च्या दिशेने जात असता कुत्र्यांच्या टोळक्या समोर अचानक अस्वल आली. Bear in city

झोमॅटो डिलिव्हरी बॉय घाबरला आणि त्याने आपली दुचाकी थांबवली, अचानक अस्वल त्याच्या दिशेने येत असल्याचे बघून त्या डिलिव्हरी बॉय ने आपला जीव वाचवित निघून गेला. (Chandrapur city)

त्याचक्षणी एक चारचाकी वाहन येताना दिसले, त्या वाहनसमोर अस्वल उभे ठाकले, काही वेळात अस्वलने बागला चौकातून पळ काढला.

चंद्रपुरात 9 वर्षीय मुलाचा नायलॉन मांजाने गळा चिरला

वर्ष 2023 मध्ये जानेवारी महिन्यात अंचलेश्वर मंदिर च्या मागील भागातून अस्वल चंद्रपूर शहरात दाखल झाले होते, त्यावेळी ते अस्वल बागला चौकात आले.

दिवसेंदिवस वन्यप्राणी शहराकडे कूच करीत आहे, भविष्यात हा धोका पुन्हा वाढणार हे निश्चित.

The bear in city

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!