brutal murder |चंद्रपुरात अल्पवयीन मुलाची क्रूरपणे हत्या

brutal murder

brutal murder : 3 जानेवारी रोजी चंद्रपूर शहरात 17 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी 3 आरोपीना अटक केली असून एक आरोपी अद्याप पसार आहे. मृतकाचे नाव तन्मय असून तो बाबूपेठ येथील रहिवासी होता.

चंद्रपुरात 13 किलो गांजा सहित दोन आरोपीना अटक

सूत्राच्या माहितीनुसार तन्मय हा घराकडे जात असताना वाटेत काहींच्या दुचाकी वाहनाला त्याच्या वाहनाचा कट लागल्याने चार अल्पवयीन मुलांनी तन्मय ला कट का मारली म्हणून मारहाण केली, त्यानंतर त्याला बाबूपेठ रेल्वे फाटक जवळील रेल्वे पटरी जवळ त्याला मारहाण करीत दगडाने ठेचून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
आरोपीनी अत्यंत क्रूरतेने तन्मय ची हत्या केली असून त्याचा चेहरा ही ओळखणे कठीण आहे.


शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आरोपीना अटक केली आहे. हत्येचे नेमकं कारण काय हे पूर्ण तपास झाल्यावर कळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!