burglary crimes act । चंद्रपूर शहरात घरफोडी, लाखोंचे सोने लंपास

burglary crimes act

burglary crimes act : चंद्रपूर शहरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून यामध्ये चोरी व घरफोडी याचा समावेश आहे, आज बाहेर जात असताना सुद्धा परत येईपर्यंत नागरिकांच्या मनात चोरीची भीती सतावत असते. चंद्रपुरातील बागला चौकातील पोलीस चौकीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर १९ जानेवारीला घरफोडीची घटना घडली, यामध्ये लाखोंचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला.

त्या मजुरांसाठी विजय वडेट्टीवार ठरले देवदूत

४३ वर्षीय विनोद अनंतवार यांनी २० जानेवारीला शहर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली कि १४ जानेवारीला फिर्यादीची पत्नी बाहेरगावी गेली होती, त्यामुळे अनंतवार हे घरी एकटे होते, १९ जानेवारीला सायंकाळी विनोद अनंतवार हे बागला चौकात फिरायला गेले त्यानंतर बाहेर जेवण करून घरी रात्री १० वाजताच्या सुमारास परतले असता घराचे दार उघडे होते, अलमारीतील कपडे अस्तव्यस्त स्थितीत पडलेले होते.

अज्ञात चोराने घराच्या मागच्या बाजूला असलेल्या बाथरूम च्या भिंतीचे विटा काढून घरात प्रवेश केला, अलमारीत असलेल्या कापडी पिशवीतील जुने वापरते ३५ ग्राम सोने ज्यामध्ये सोन्याचे गोफ, लहान अंगुठी, मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने अज्ञात चोराने लंपास केले.

विशेष बाब म्हणजे फिर्यादी विनोद अनंतवार यांच्या घरापासून अवघ्या काही अंतरावर महाकाली पोलीस चौकी आहे, पोलिसांना न घाबरता चोराने आपला डाव साधला. गुन्हा दाखल होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, घटनेचा पंचनामा करीत पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर भारतीय न्याय संहिता बीएनएस २०२३ कलम ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!