cdcc bank chandrapur
cdcc bank chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची पदभरती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे, वर्ष 2024 मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत लिपिक, शिपाई असे एकूण 358 पदासाठी पदभरती निघाली होती, मात्र भरती प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी वादात सापडली.
पदभरती जाहिरातीत एकही पद कुठल्याही जात-प्रवर्गासाठी राखीव नव्हते, भरती प्रक्रिया रद्द व्हावी यावर अनेकांनी आवाज उचलला मात्र याबाबती कसलीही सूनवाई झाली नाही.
याविरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने बँके समोर मनोज पोतराजे यांचं आमरण उपोषण सुरू आहे. Cdcc bank
चंद्रपुरच्या आमदारांचे दमदार काम
22 डिसेंबर रोजी बँकेच्या परीक्षा घेण्यात आल्या मात्र तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करीत परीक्षा रद्द झाली.
2 दिवसांनी पुन्हा परीक्षा घेण्यात आली, यावेळी ऑनलाइन उत्तर नोंदवताना शेवट च्या पर्याय बदलत होते असा आरोप अनेक उमेदवारांनी केला.
परीक्षा संपली मुलाखती सुरू झाल्या, मुलाखतीची वेळ दिली मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाली नाही, ज्यांना जास्त गुण मिळाले त्यांना मुलाखतीला बोलावणं टाळलं तर कमी गुण असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात आलं.
चंद्रपुरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाची माहिती राज्यातील असंख्य उमेदवारांना मिळाली त्यांनतर परभणी जिल्ह्यातील उमेदवार दत्ता पौळ यांनी 22 जानेवारीला आमरण उपोषण मंडपात भेट देत परीक्षेत कसा घोळ झाला याबाबत सविस्तर माहिती दिली.