Cdcc Bank | नोकरीची किंमत 25 ते 40 लाख

cdcc bank

Cdcc bank : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याची बाब परीक्षार्थी यांनी उघडकीस आणली सोबतच 358 पदांसाठी घेण्यात आलेल्या पदभरती मध्ये बँकेने आरक्षण संपविले.
संपूर्ण भरती प्रक्रिया खुल्या प्रवर्गात घेण्यात आली, आपल्या आर्थिक हितासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोकरी मधील आरक्षण संपविले याविरोधात आरक्षण बचाव कृती समितीने 16 जानेवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामकरण

आज 23 जानेवारीला आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.


तत्पूर्वी उपोषण मंडपाला माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देत उपोषणकर्ते मनोज पोतराजे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. मुनगंटीवार म्हणाले की नोकरीचा अधिकार हा सर्वांचा आहे, आरक्षणानुसार हा अधिकार सर्व प्रवर्गाना भेटायला हवा मात्र देशात पहिल्यांदाचं चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने आरक्षण संपविण्याचे कृत्य केले आहे. जर उपोषणकर्ते यांच्या जिवाचं काही बरं वाईट झालं तर त्याला प्रशासन व सहकार विभाग पूर्णतः जबाबदार राहणार.

सिडीसीसी बँक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती सदस्य व विद्यार्थी यांनी भव्य मोर्चा काढला. यावेळी राजू कुकडे यांनी बँक व्यवस्थापनावर थेट आरोप लावत प्रत्येक जागेसाठी 25 ते 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप लावला. परीक्षेत आलेल्या प्रश्नांचे योग्य पर्याय निवडत त्याचे पर्याय शेवटी बदलले, परीक्षा केंद्रावर गडबडी करण्यात आली.


महत्वाचे म्हणजे प्रत्येक जात-प्रवर्गाला नोकरीपासून वंचित ठेवण्याचा घाट बँक व्यवस्थापनाने रचला याविरोधात आम्ही आमरण उपोषण व आज धडक मोर्चा काढला आहे. आयोजित मोर्च्यात असंख्य विद्यार्थी व नागरिकांची उपस्थिती होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!