cdcc bank controversial recruitment । सीडीसीसी बँकेची पदभरती रद्द होणार?

cdcc bank controversial recruitment

cdcc bank controversial recruitment : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती प्रक्रियेत आरक्षण डावलल्याने आरक्षण बचाव कृती संघर्ष समितीने मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन सुरु केले. १६ जानेवारी पासून समितीचे सदस्य मनोज पोतराजे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. आंदोलन मंडपाला अनेक आमदारांनी भेट दिली मात्र ठोस कारवाई झाली नाही. अखेर माजी मंत्री मुनगंटीवार यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करीत बँकेने आरक्षण डावलत संविधानाचा अपमान केला आहे आम्ही ते खपवून घेणार नाही म्हणत उपोषण कर्त्यांच्या मी पाठीशी आहे अशी ग्वाही दिली.

सीडीसीसी बँकेविरोधात आपची ईडी कडे तक्रार

सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत समिती सदस्यांसोबत मुंबई गाठत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत त्यांना बँकेतर्फे भरती प्रक्रियेत केलेल्या घोळाची माहिती दिली, आरक्षण संपविण्याची कृती राज्यात चालणार नाही यावर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.

२९ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, बँकेच्या भरती प्रक्रियेवर आपण कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनोज पोतराजे व रमेश काळबांधे यांना निंबू पाणी पाजत उपोषण मागे घेतले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!