Chandrapur bjp । पालकमंत्री उईके यांचा कार्यक्रम अयशस्वी करण्यासाठी पदाधिकाऱ्याने केली दिशाभूल

chandrapur bjp

chandrapur bjp : भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा प्रसार करून पक्षवाढीसाठी काम करण्याची शपथ घेतलेल्या कार्यकर्त्यांकडूनच पक्षवाढीसाठी आयोजित कार्यक्रमाला अडथळा आणण्याचा प्रकार समोर आला आहे. आदिवासी संघर्ष कृती समिती आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आयोजित पालकमंत्री सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने हा प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रपुरात कांग्रेसचे आंदोलन, निवडणूक आयोगाचा केला निषेध


पालकमंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या चंद्रपूरातील प्रथम आगमनानिमित्त प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात सायंकाळी सात वाजता सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, नियोजित वेळ सात वाजताची असतानाही भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्यांना दुपारी साडेतीन वाजताच कार्यक्रमाला येण्याचे निरोप पाठवले. या गोंधळामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, नियोजित वेळेत उपस्थिती कमी राहावी यासाठी हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आहे.


कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे पक्षातील शिस्त ढासळल्याचे बोलले जात आहे. पक्षवाढीसाठी आयोजित कार्यक्रमाला अडथळा निर्माण करण्याचा हा प्रकार पक्षासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. प्रमुख पदाधिकाऱ्याने असे वर्तन करणे पक्षाच्या शिस्तीला हरताळ फासणारे असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या प्रकारामुळे पक्षाच्या एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


सत्कार सोहळा सायंकाळी सात वाजताच होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले असून, नियोजित वेळेत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून पक्षविरोधी वर्तन होत असल्याने पक्षाच्या गटांतर्गत मतभेद उघड होऊ लागले आहेत.

ज्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाला यावे असा निरोप दिला त्यांच्या विरुद्ध पक्षात चांगलाच असंतोष पसरला आहे, निवडणूक असो पक्ष वाढीसाठी प्रयत्न यामध्ये हा पदाधिकारी सपेशल फेल ठरला आहे. या पदाधिकाऱ्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा नुकसान झालं आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!